Just another WordPress site

गाडऱ्या-जामन्या जंगलात अत्यंत कुजलेल्या अवस्थेत महिलेचा मृतदेह मिळाल्याने परिसरात खळबळ !!

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-

दि.१५ एप्रिल २५ मंगळवार

तालुक्यातील सातपुडा पर्वताच्या अतिदुर्गम भागातील गाड्या-जामन्या या आदिवासी वस्तीच्या भागातून धक्कादायक माहीती समोर येत असून या ठिकाणी एका ३० ते ४० वर्ष वयोगटातील महिलेचा अत्यंत कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.सदर घटनेबाबत यावल पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून  सदरील महिलेचा मृत्यू सशस्पद असल्याने घातपात झाल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

या संदर्भात विश्वसनिय सुत्रांकडून मिळालेली माहीती अशी की,तालुक्यातील अतिदुर्गम भागातील गाडऱ्या जामन्या या ठीकाणी निळकंठ कुटिया जवळ कोरडया तलाव असून या क्षेत्रातुन वन विभागाचे कर्मचारी जात असतांना त्यांना तलावात अनोळखी अंदाजे ३o ते ४० वर्षीय माहिलेचा अत्यंत कुजलेल्या अवस्थेत मृतदेह सोमवार दि.१४ एप्रिल रोजी दूपारच्या सुमारास दिसुन आला . दरम्यान या घटनेची माहिती मिळाल्यावर यावल पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रदीप ठाकूर यांनी तात्काळ दखल घेत आपल्या पोलीस पथकासह घटनास्थळी धाव घेतली.याबाबत यावल पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली असुन या अनोळखी महीलेचा मृत्यु कशामुळे झाला ? याची माहिती अद्यापपर्यंत समोर आलेली नाही.प्राथमिक माहितीनुसार महिलेसोबत घातपात झाल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे.सदरहू मरण पावलेल्या महिलेचा मृतदेह पोलीसांनी ताब्यात घेत प्रथमदर्शनी महीलेचा मृत्यु संशयास्पद वाटल्याने तिचा मृतदेह हा यावलहून जळगाव येथे जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठविण्यात आला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.