Just another WordPress site

मनवेल येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या मिरवणुकीत जातीयवाद्यांकडून राडा !! यावल पोलीसात १६ जणांविरुद्ध परस्पर गुन्हे दाखल !!

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-

दि.१६ एप्रिल २५ बुधवार

तालुक्यातील मनवेल येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्ताने मिरवणुक एका धार्मिक स्थळाजवळ आली असता काही (जातीयवाद्यांनी) समाजकंटकानी डॉ.बाबासाहेबांच्या गाण्यावर नृत्य करीत असलेल्या महीलांच्या अंगावर चिल्लर पैसे फेकुन त्यांचा अपमान केला व बेकायद्याशीर मंडळी जमा करून मिरवणुकीत सहभागी महिला व पुरुषांना चापट बुक्क्यांनी तसेच काठयांनी मारहाण केल्याची फिर्याद सुनिता विकास अडकमोल यांनी दिली असून यावल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.तर दुसऱ्या बाजुने पन्नालाल पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरून मिरवणुकीतील वाद्याची गाडी जवळच्या एका मंदीराच्या भिंतीला लागल्याने मिरवणुकीतील सहभागी मंडळींना नुकसानाबाबत विचारणा करण्यास गेल्याने झालेल्या वादामुळे परस्पर विरुद्ध रात्री उशिरापर्यंत दोन्ही गटातील १६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या संदर्भात पोलीस सुत्रांकडून मिळालेली माहिती अशी की,तालुक्यातील मनवेल येथे दि.१४ एप्रील रोजी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची मिरवणुक समाज बांधवांच्या वतीने काढण्यात आली होती.दरम्यान सदरची मिरवणुक ही एका धार्मिक स्थळाजवळ आली असता रात्री ८.३० वाजेच्या सुमारास मिरवणुकीत डॉ.बाबासाहेबांचे गाणे वाजत असतांना काही महिला या गाण्यांवर नृत्य करीत असतांना गावातील एका धार्मिक स्थळाजवळ असलेले काही समाजकंटक यांनी नृत्य करणाऱ्या महिलांच्या अंगावर नाण्यांच्या ( चिल्लर ) च्या स्वरूपात पैसे त्यांच्या अंगावर फेकले व त्यांना अपमानीत केले व असे असतांना देखील गावातील नाना रमण पाटील,कुणाल शाम पाटील,थज्ञेस पंडीत पाटील,हर्षल रणछोड पाटील व भरत कोळी आणी शंकर देविदास पाटील यांनी गावातील मिरवणुकीच्या मार्गावरील दुसऱ्या एका धार्मिक स्थळाजवळ बेकाद्याशीर मंडळी जमवुन मिरवणुकीत सहभागी महिला यांना चापटाबुक्यांनी व आदेश इंधाटे आणि राज संजय भालेराव यांना लाठयाकाठयांनी मारहाण करून अपमानीत केले अशी फिर्याद सुनिता विकास अडकमोल वय ४o वर्ष यांनी दिली आहे.तर दुसऱ्या गटातील पन्नालाल पाटील यांच्या फिर्यादीवरून यावल पोलीस ठाण्यात दोन्ही गटातील एकुण १६ जणांविरुद्ध परस्पर विरोधात गुन्हा दाखल करण्यात दाखल करण्यात असुन पुढील तपास पोलीस करीत आहे.दरम्यान पन्नालाल पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की,डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची मिरवणुक गावातुन सुरू असतांना मिरवणुकीच्या वाद्याची गाडी हे जवळच्या मंदिरास लागल्याने भिंतीचे नुकसान झाले असतांना याबाबत विचारणा करण्यास गेले असता या ठिकाणी नयन विनोद अडकमोल,आदेश विलास इंधाटे,विलास सुभान इंधाटे,सुभाष राजधर भालेराव,प्रथमेश सोनवणे,भुषण संजय भालेराव,सागर संतोष इंधाटे,योगेश भगवान इंधाटे,मनोज सुभाष भालेराव,योगेश भगवान इंधाटे आणि गोकुळ समाधान इंधाटे सर्व राहणार मनवेल यांनी मारहाण करीत फिर्यादीच्या गळयातील एक तोडयाची सोन्याची चैन आणि खिशातील पाच हजार रूपयांची रोकड कुणीतरी काढून घेतली आणी लोखंडी पाईपने पायाला मारून दुखापत केली म्हणुन वरील दहा जणांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या प्रकरणाचा तपास उपविभागीय पोलीस अधिकारी कृष्णांत पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरिक्षक सुनिल मोरे व पोलीस करीत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.