दि.१७ एप्रिल २५ गुरुवार
तालुक्यातील डोंगर कठोरा येथे शासनाच्या नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प टप्पा-२ अंतर्गत लोकसहभागीय सूक्ष्म नियोजन योजनेअंतर्गत आज दि.१७ एप्रिल गुरुवार रोजी सकाळी ८.३० वाजेच्या सुमारास डोंगर कठोरा शेत शिवारात अनिल राणे व धनराज पाटील या शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन शिवार फेरी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.या शिवार फेरी कार्यक्रमात श्रमदानातून बांधचर खोदणे,माती परीक्षण व विहीर मोजणी असे शासनाच्या नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प टप्पा-२ अंतर्गत उपक्रम घेण्यात आले.
सदर शिवार फेरी कार्यक्रमात जिल्हा सूक्ष्म नियोजन समन्वयक तुषार देसाई,कृषी पर्यवेक्षक एन.जी.पाटील,कृषी सहाय्यक आर.बी.पवार यांनी शासनाच्या नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प टप्पा-२ अंतर्गत माती परीक्षण कसे करायचे,माती परीक्षणाचे फायदे व लागणारा खर्च तसेच विहीर मोजणी कशी करावी याचे प्रात्यक्षिक करून दाखविले.यावेळी सरपंच नवाज तडवी,उपसरपंच धनराज पाटील,ग्रामविकास अधिकारी ए.टी.बगाडे,ग्रामपंचायत सदस्या कल्पना राणे,जिल्हा सूक्ष्म नियोजन समन्वयक तुषार देसाई,कृषी पर्यवेक्षक एन.जी.पाटील,कृषी सहाय्यक आर.बी.पवार,रोजगार सेवक डिगंबर खडसे,शरद राणे,सुरेश झांबरे,प्रदीप पाटील,भोजराज पाटील,राजाराम बाऊस्कर,रामा पाटील,सतीश जावळे,प्रकाश राणे,मिलिंद महाजन,प्रवीण पाटील,सायबू तडवी,लीलाधर पाटील,सुधाकर वराडे,खेमा पाटील,सुपडू जंगले,कीर्ती महाजन,हर्षदा कोलते,ज्योती कोलते,हुमाबाई तडवी यांच्यासह ग्रामस्थ या शेत शिवार कार्यक्रमात सहभागी झाले होते.
दरम्यान शासनाच्या नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प टप्पा-२ अंतर्गत लोकसहभागीय सूक्ष्म नियोजन योजनेअंतर्गत आज दि.१७ एप्रिल गुरुवार रोजी संध्याकाळी ५ वाजता महिला ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले आहे.तसेच या कार्यक्रम अंतर्गत २१ एप्रिल २५ या कालावधीत श्रमदान,शिवार फेरी,माती परीक्षण,विहीर तपासणी सह विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे.तरी गावकरी व शेतकरी बांधव यांनी शासनाच्या नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प टप्पा-२ या लोकसहभागीय कार्यक्रमात सहभागी होऊन शासन योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन कृषी पर्यवेक्षक एन.जी.पाटील,कृषी सहाय्यक आर.बी.पवार व सविता पवार यांनी केले आहे.