यावल-फैजपुर मार्गावर अज्ञाताकडून झाड जाळुन पाडण्याचा प्रयत्न !! आगार वनरक्षकांच्या कार्यतत्परतेमुळे जिवीतहानी टळली !! तालुक्यात लाकूडतोड्याचा सुळसुळाट वाढल्याची शंका !!
यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
दि.१९ एप्रिल २५ शनिवार
तालुक्यातील यावल-फैजपुर महामार्गावरील रस्त्यावर पर्यावरण शत्रुंकडून (अवैध लाकूडतोड्यांकडून) जिवंत झाडे जाळून पाडण्याचा प्रयत्न येथील वन विभाग आगार वनरक्षक बि.बि. गायकवाड यांनी वेळीच दाखवलेल्या कार्यतत्परतेमुळे मोठा अपघात व जिवीतहानी टळली आहे.दरम्यान तालुक्यात अवैध लाकूडतोड्यांचा सुळसुळाट वाढला कि काय अशी शंका वृक्ष प्रेमींकडून व्यक्त केली जात असून या अवैध लाकूडतोड्यांवर वेळीच पायबंद घालण्यात यावा अशी आग्रही मागणी वृक्ष प्रेमींकडून करण्यात आली आहे.
या संदर्भात मिळालेली माहिती अशी की,यावल ते फैजपुर या राज्य महामार्गावरील रस्त्यावर कला,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयासमोर असलेल्या परिसरात डोलेदार झाडाला जाळून पाडण्याचा प्रकार पुनश्च समोर आला असुन तालुक्यातील भुरटे लाकुड व्यापारी व पर्यावरण शत्रु यांच्याकडून वारंवार तालुक्यात जिवंत वृक्षाला जाळून पाडण्याचा प्रकार होत आहे.दरम्यान काल सायंकाळच्या सुमारास कुणीतरी अज्ञात पर्यावरण शत्रुकडून मार्गावरील डोलेदार वृक्षाला पेटवुन पाडण्यात येत असतांनाची माहीती मिळताच यावल येथे वनविभागात कार्यरत असलेले आगार वनरक्षक बि.बि.गायकवाड तात्काळ त्या ठिकाणी कार्यत्परता दाखवुन वेळीच दखल घेत घटनास्थळी धाव घेतली व पेटलेले झाड रस्त्यावर पडणार असल्याने बि.बि.गायकवाड यांनी मार्गावरील वाहनांची वर्दळ थांबवली अन्यथा पेटलेले झाड रस्त्यावरून जाणाऱ्या वाहनावर पडल्याने मोठी जिवितहानी झाली असती.दरम्यान काही वेळेत झाड जळाल्याने मार्गावर पडल्याने नंतर नागरीकांच्या मदतीने त्या झाडाला विझवुन रस्त्याच्या बाजुला करून पुनश्च वाहतुक सुरळीत केली.सदरच्या प्रकाराने बि.बि.गायकवाड हे वेळेवर त्या ठिकाणी गेले नसते तर काही तरी अप्रीय घटना या ठीकाणी घडली असती म्हणुन उपस्थित वाहनधारक व नागरीकांनी यावलचे आगार वनरक्षक गायकवाड यांचे कौत्तुक केले आहे.