यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
दि.१९ एप्रिल २५ शनिवार
तालुक्यात मनवेलसह अनेक ठीकाणी सुरू असलेली जलजीवन मिशन योजना व अन्य योजनेअंतर्गत होणाऱ्या कामाचे तीनतेरा वाजले असून शासनाच्या लाखो रुपयांचा लाखो रुपयांचा निधी हा पुर्णपणे पाण्यात गेल्याचे चित्र पहावयास मिळत असुन अनेक वर्षापासून संबधीत विभागाच्या दुर्लक्षीत कारभारावर ग्रामीण नागरीकांमध्ये संत्पत भावना व्यक्त होत आहे.
तालुक्यातील मनवेल व हिंगोणासह अजून काही ठिकाणी सुरू असलेली काही कामे ही ठेकेदाराच्या हलगर्जी पणामुळे व काही कामे हे निधी अभावी बंद असल्याचे दिसून येत आहे.जलजीवन मिशन योजना अर्तगत जलकुंभ (पाण्याची टाकी) बांधकाम हे अतिशय संथगतीने सुरू आहे तर पाण्याची टुयबेल करण्यात आली असून त्याठिकाणी विज कनेक्शन नसल्यामुळे पाणी टाकी पर्यंत पोहचु शकत नसल्यामुळे ऐन उन्हाळ्यात गावात पाण्याची समस्या जाणवत आहे.गेल्या दोन वर्षांपासून सुरू असलेल्या जलजीवन मिशन अंतर्गत पाणी पुरवठा योजनाचे काम हे नीधी अभावी संथ गतीने सुरू असल्याचे कारण ठेकेदारांकडून सांगितले जात आहे.मनवेल गावातील ग्रामस्थांना होणारा पाणीपुरवठा एक दिवसा आड सुरू आहे अजून दिड महिना उन्हाळा असुन गावात पाणीटंचाई निर्माण होऊ नये म्हणून ग्रामपंचायतमार्फत नियोजन केले जात आहे मात्र ठेकेदार जलकुंभच्या कामाकडे दुर्लक्ष करून कामचुकारपणा करीत असल्याने जलजीवन मिशन पाणी पुरवठाचे कामाकडे अधिकाऱ्यांनी लक्ष केंद्रित करून काम सुरू करावे अशी मागणी होत आहे.दरम्यान तालुक्यातील मनवेल,हिंगोणा,सांगवी बु॥ या गावासह काही गावांमध्ये जलकुंभाची उभारणी झाली आहे तर काही ठिकाणी सदरील काम गेल्या अनेक वर्षापासून अत्यंत संथ गतीने होत आहे.यातील हिंगोणा येथे पाईपलाईप टाकली गेली नसल्याने सध्या सुरू असलेल्या पाण्याच्या टुबवेलजवळ पाईप लाईन खोदून पूर्ण झाली आहेत मात्र पाईप लाईनचे कनेक्शन जोडणी केली नाही त्यामुळे पाईपलाईन उघडयावर पडून आहे.सदरहू जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी कामांकडे लक्ष केंद्रित करून जलजीवन मिशन अंतर्गत तालुक्यातील रखडलेले काम हे पुर्ण करण्यासाठी ठेकेदाराला ताकीद द्यावी अशी मागणी करण्यात येत आहे.