यावल -पोलीस नायक (तालुका प्रतिनिधी) :- येथील काझीपुरा भागातील रहिवाशी नजीमा बानो काझी या महिलेचा काळ सायंकाळी ७.३० वाजेच्या सुमारास कुऱ्हाडीने वार करून खून करण्यात आला होता. यावेळी पोलिसांनी सदरील संशयितास भादंवि कलम ३०२ अन्वये अटक केली होती.या नराधमास आज न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने जावेद पटेल यास पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
याप्रकरणी मयत महिलेचा पती जाकीर अहमद काझी वय ४३ यांनी पोलिसात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की ,गेल्या तीन महिन्यापूर्वी जावेद युनूस पटेल व माझी पत्नि नजिमा बानो काझी यांच्यासोबत भांडण झाले होते.सदरील भांडणाच्या रागाउन जावेद पटेल याने नजीमा बानो हीच २७ ऑगस्ट रोजी खून केला असे फिर्यादीत म्हटले आहे.