Just another WordPress site

भाजपा तालुका मंडळ अध्यक्षपदाची जबाबदारी सागर कोळी,अनिल पाटील व उमेश बेंडाळे या तीन युवा नेतृत्वाकडे !!

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-

दि.२२ एप्रिल २५ मंगळवार

आगामी काळात होवु घातलेल्या स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर यावल तालुक्यात भारतीय जनता पार्टीच्या कार्यकारिणीची निवड प्रक्रिया नुकतीच पार पडली असून यात प्रथमच एकाच वेळी तीन मंडळ अध्यक्षांची नियुक्ती करण्यात आली आहे.सदर निवडीनंतर तालुक्यातील भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

दरम्यान किनगाव-साकळी मंडळाचे अध्यक्षपद अनिल रामराव पाटील यांच्याकडे सोपवण्यात आले असून यावल मंडळाच्या अध्यक्षपदी सागर कोळी यांची नियुक्ती करण्यात आली आहे तर  फैजपूर तालुका मंडळ अध्यक्ष म्हणून उमेश बेंडाळे यांची निवड करण्यात आली आहे.या नव्या युवा नेतृत्वाच्या निवडीमुळे तालुक्यात भाजपच्या संघटनात्मक बांधणीला अधिक बळकटी मिळेल असा विश्वास स्थानिक कार्यकर्त्यांकडून व्यक्त करण्यात येत आहे.नव्याने झालेल्या अध्यक्षांचे सर्वत्र अभिनंदन होत असून त्यांच्या भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या जात आहे.यावेळी  भाजपाच्या जळगाव जिल्हा ग्रामीणचे उपाध्यक्ष शरद महाजन तसेच यावल कृषी उत्पन्न बाजार समितीचे राकेश फेगडे,भाजपाचे यावल तालुका अध्यक्ष उमेश फेंगडे,भरत महाजन,भरत पाटील,उज्जेनसिंग राजपूत,हर्षल पाटील,नारायण चौधरी,नागेश्वर साळवे,मुकेश कोळी,योगेश चौधरी,हेमराज फेगडे आदी उपस्थित होते.भाजपने घेतलेला हा निर्णय पक्षाच्या विस्तार आणि संघटनबळ वृद्धीच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरणार आहे असे मत तालुक्यातील वरिष्ठ नेत्यांनी यावेळी व्यक्त केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.