Just another WordPress site

यावल येथे शिवसेना शिंदे गटाच्या ऑनलाईन सदस्य नोंदणीला युवकांचा उत्स्फुर्त प्रतिसाद !!

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-

दि.२४ एप्रिल २५ गुरुवार

शिवसेनेचे शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख समाधान महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली व्यासनगरी यावल शहरात राज्याचे उपमुख्यमंत्री ना.एकनाथ शिंदे यांच्या आदेशाने जळगाव जिल्ह्यातील प्रत्येक शहरांमध्ये शिवसेनाच्या वतीने राबविण्यात आलेल्या ऑनलाईन सदस्य नोंदणी अभियांनास युवकांचा उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला.

पक्षाचे प्रमुख उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली जळगाव जिल्ह्यात सर्व तालुक्यातील शहरी क्षेत्रात पक्ष संघटन अधिक बळकट व मजबुत करण्याचे आदेश पारित करण्यात आले होते व त्या अनुषंगाने शिवसेना शिंदे गट पक्षाचे जळगाव जिल्हा अध्यक्ष समाधान महाजन यांच्या नेतृत्वाखाली यावल शहरात ऑनलाईन सदस्य नोंदणी अभियान राबविण्यात आले.या ऑनलाईन सदस्य नोंदणी कार्यक्रमा प्रसंगी पक्षाचे यावल तालुका प्रमुख राजेश काटोके,पक्षाचे रावेर लोकसभा क्षेत्र जिल्हा उपसंघटक नितीन सोनार,यावल शहरप्रमुख पंकज बारी,राजू सपकाळे,उपशहर प्रमुख व शहरातील युवा सेना तालुका प्रमुख अजय तायडे यांच्यासह शहरातील शिवसैनिक प्रामुख्याने उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.