यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
दि.२४ एप्रिल २५ गुरुवार
येथील एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय अंतर्गत काल दि.२३ एप्रील २५ रोजी एक दिवसीय विशेष प्रशिक्षण सत्र कार्यक्रमाचे आयोजित करण्यात आले.सदर प्रशिक्षणात प्रकल्प कार्यालया अंतर्गत येणाऱ्या सर्व आश्रम शाळांचे मुख्याध्यापक,सर्व वस्तीगृहांचे गृहपाल तसेच कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी यांनी या प्रशिक्षणात आपला सहभाग नोंदविला.
या प्रशिक्षणा मध्ये ए.आय.(कृत्रिम बुद्धिमत्ता) या विषयावर सखोल मार्गदर्शन करण्यात आले.यामध्ये ए.आय.तंत्रज्ञानाचा शिक्षण,प्रशासन व दैनंदिन कामकाजामध्ये वापर कसा करता येईल ? यावर विशेष भर देण्यात आला.प्रशिक्षण सत्रास जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांचे स्वीय सहाय्यक मिलिंद बुवा यांची विशेष उपस्थिती लाभली व त्यांच्या मार्गदर्शनामुळे प्रशिक्षण अधिक प्रभावी व प्रेरणादायी ठरले.सदर उपक्रमामुळे उपस्थितांना ए.आय.च्या माध्यमातून कार्यक्षमतेत वाढ कशी करता येईल ? याची माहिती मिळाली आणि भविष्यातील कामकाज अधिक तंत्रज्ञानाधिष्ठित कसे करता येईल ? याची माहिती देण्यात आली.सदर प्रशिक्षणावेळी प्रकल्प अधिकारी अरूण पवार व त्यांचे सर्व अधिकारी व कर्मचारी प्रामुख्याने उपस्थित होते.