आदिवासी पाडा गावांना महसुली दर्जा देण्याची उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल यावल तहसील कार्यालय पुरस्काराने सन्मानित !!
यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
दि.२६ एप्रिल २५ शनिवार
येथील तहसील कार्यालय अंतर्गत येणाऱ्या आदिवासी क्षेत्रातील वाडी,वस्ती आणि पाडा यांना महसुली दर्जा देण्याची कामगिरी केल्याबद्दल तहसीलदार मोहनमाला नाझीरकर यांना उत्कृष्ट तहसील कार्यालयाचा यावर्षीचा पुरस्कार जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री व राज्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते नुकताच देण्यात आला.
जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात संपन्न झालेल्या या सन्मान सोहळा कार्यक्रमास जिल्हाधिकारी आयुष प्रसाद,आमदार राजू मामा भोळे,आमदार किशोर अप्पा पाटील यांच्या हस्ते देखील महसुल पथकास सन्मानित करण्यात आले.या महसुल पथकामध्ये तहसीलदार मोहनमाला नाझीरकर,निवासी नायब तहसीलदार संतोष विनंते,मंडळ अधिकारी अतुल बडगुजर,तलाठी मनीषा बारेला,कुर्शाद तडवी,अव्वल कारकून निशा चव्हाण यांना सन्मानपत्र आणि स्मृतीचिन्ह देवुन गौरविण्यात आले.दरम्यान जिल्ह्यातील सहा तलाठी यांना इ चावडी वसुली अंतर्गत सजाची संपूर्ण वसुली पूर्ण करणे आणि तीन लाखापेक्षा जास्त वसुली करण्यात यशस्वी झालेले यावल तालुक्यातील दोन तलाठी भूषण सूर्यवंशी आणि डोंगर कठोरा तलाठी गजानन पाटील यांना देखील या सोहळ्यात विशेष पुरस्काराने गौरविण्यात आले.