जळगाव-पोलीस नायक(प्रतिनिधी):-
आज दि.२० रोजी जिल्हा परिषद येथील साने गुरुजी सभागृहात मुख्यकार्यकारी अधिकारी मा.डाॕ.पंकजकुमार आशिया यांच्या अध्यक्षतेखाली कर्मचारी तक्रार निवारण सभा मोठ्या उत्साहात संपन्न झाली.या सभेस मा.स्नेहा कुडचेपवार मॕडम उपमुकाअ साप्रवि,मा.भिकनराव पाटील साहेब मुख्य लेखा व वित्त अधिकारी मा.विकास पाटीलसाहेब शिक्षणाधिकारी प्राथ.मा.जिल्हाआरोग्य अधिकारी, इतर विभाचे अधिकारी व कर्मचारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष व सरचिटणीस उपस्थित होते.
यावेळी शिक्षक भारती प्राथमिक जळगावच्या वतीने वरिल पत्रातील पीडीएफ मधील सर्व मुद्दे व शिक्षक बंधूभगिनी यांची डिसिपीएस मधील रकमा एनपीएस मध्ये वर्ग होणेबाबत शिक्षक भारती प्राथमिक जळगावच्या वतीने जिल्हाध्यक्ष सोमनाथ पाटील यांनी मांडले.सर्व प्रश्न सोडविण्याचे आश्वासन मा. डॉ.पंकजकुमार आशिया व विभाग प्रमुख यांनी दिले.सोबत शिक्षक भारती जिल्हाकार्याध्यक्ष अजयकुमार पाटील होते.