Just another WordPress site

डोंगर कठोरा तलाठी गजानन पाटील यांचा १०० टक्के वसुलीबद्दल पालकमंत्र्यांच्या हस्ते सत्कार !!

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-

दि.२६ एप्रिल २५ शनिवार

तालुक्यातील डोंगर कठोरा येथील कर्तव्यदक्ष तलाठी गजानन पाटील यांनी आपल्या प्रशासकीय कामात कायम नियमितता ठेऊन ई-चावडी वसुली अंतर्गत डोंगर कठोरा तलाठी सजा कार्यालयाची (१०० टक्के वसुली) संपूर्ण वसुली पूर्ण करणे आणि तीन लाखापेक्षा जास्त वसुली करण्यात यशस्वी अशी कामगिरी केल्याबद्दल त्यांच्या कार्याचा गौरव म्हणून त्यांना जिल्ह्याचे पालकमंत्री व राज्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते विशेष पुरस्काराने नुकतेच गौरविण्यात आले.

जिल्हा नियोजन समिती सभागृहात संपन्न झालेल्या या सन्मान सोहळा कार्यक्रमास जिल्हाधिकारी आयुष प्रसाद,आमदार राजू मामा भोळे,आमदार किशोर अप्पा पाटील यांच्या हस्ते तहसीलदार मोहनमाला नाझीरकर यांना देखील यावल तहसील कार्यालया अंतर्गत येणाऱ्या आदिवासी क्षेत्रातील वाडी,वस्ती आणि पाडा यांना महसुली गावांना दर्जा देणे कमी उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल उत्कृष्ट तहसील कार्यालयाचा यावर्षीचा पुरस्कार यावल महसुल पथकास देण्यात आला.तर तलाठी गजानन पाटील यांनी ई-चावडी वसुली अंतर्गत डोंगर कठोरा तलाठी सजा कार्यालयाची (१०० टक्के वसुली) संपूर्ण वसुली पूर्ण केल्याबद्दल त्यांच्या कार्याचा गौरव म्हणून त्यांना जिल्ह्याचे पालकमंत्री व राज्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते विशेष पुरस्काराने गौरविण्यात आले.यावेळी तहसीलदार मोहनमाला नाझीरकर,निवासी नायब तहसीलदार संतोष विनंते,मंडळ अधिकारी अतुल बडगुजर,तलाठी मनीषा बारेला,कुर्शाद तडवी, अव्वल कारकून निशा चव्हाण यांच्यासह तहसील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.