यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
दि.२८ एप्रिल २५ सोमवार
येथील एसटी आगारातील कर्मचारी बांधवांची आरोग्य तपासणी शिबीर वनिता मल्टी स्पेशालिस्टी हॉस्पिटल जळगाव यांच्या माध्यमातुन नि:शुल्क आरोग्य तपासणी शिबीर नुकतेच मोठ्या उत्साहात संपन्न झाले.यावल एसटी आगारात आयोजन करण्यात आलेल्या या मोफत आरोग्य तपासणी शिबिरात यावल आगारातील सुमारे ७० कर्मचारी यांनी रुग्ण म्हणुन आपल्या आरोग्याची तपासणी करून घेतली.
कार्यक्रमाचे अध्यक्ष यावल आगार व्यवस्थापक दिलीप महाजन होते.यावेळी मार्गदर्शन करतांना आगार प्रमुख म्हणाले की,आगारातील सर्व कर्मचारी यांनी नियमितपणे आपल्या आरोग्याची तपासणी करणे हे अत्यंत गरजे असल्याचे म्हटले.प्रसंगी सहाय्यक कार्यशाळा अधिक्षक तेजस शुक्ल,आगार लेखाकार जतीन बारसे,हेड मेकॅनिक प्रकाश रावते,संदिप पाटील,लिपीक अतुल चौधरी,के.डी.चौधरी,दिलीप ठाकरे,सुकलाल सूर्यवंशी,बबलू तडवी यांनी सहकार्य केले.तर शिबिरात वनिता मल्टी स्पेशालिस्टी हॉस्पिटल जळगावचे तज्ञ डॉ.उज्वल मुंडे व डॉ.वैभवी वाणी व हॉस्पिटलचे संपुर्ण पथक उपस्थित होते.या मोफत आरोग्य तपासणी शिबिरात नि:शुल्क ब्लड शुगर आणि ब्लड प्रेशर व इ.सी जी तपासणी करण्यात येवुन सर्व रुग्णांना मोफत औषधी देखील वाटप करण्यात आल्या.तसेच महात्मा फुले जन आरोग्य योजने अंतर्गत येणाऱ्या रुग्णांची शस्त्रक्रिया सुद्धा मोफत केल्या जाणार असल्याची माहिती या शिबिरात देण्यात आली.सदर आरोग्य तपासणी शिबीर कार्यक्रम यशस्वीपणे राबविण्यासाठी तुषार महाजन व सर्व सहकार्यानी परिश्रम घेतले.