यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
दि.२९ एप्रिल २५ मंगळवार
येथील युवा सामाजिक कार्यकर्ते व कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती तसेच कोरपावली विविध कार्यकारी सहकारी सोसायटी चेअरमन राकेश वसंत फेगडे यांचा खान्देश आयकॉन पुरस्काराने नुकताच सन्मान करण्यात आला.
हॉटेल कमल पॅराडाईज सभागृह जळगाव येथे मराठी सिने अभिनेते अभिजीत खांडकेकर,आमदार राजुमामा भोळे,डॉ.अर्चना सुर्यवंशी यांच्यासह आदी मान्यवरांच्या उपस्थितीत सदर कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला.दरम्यान सप्तरंग मराठी चॅनलच्या वतीने शिक्षण,कला,सामाजिक,सहकार आदी क्षेत्रात आपल्या उल्लेखनिय कार्याचा ठसा उमटविणाऱ्या तालुक्यातील कोरपावली येथील राकेश वसंत फेगडे यांना २०२५ या वर्षाच्या खान्देश आयकॉन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.राकेश फेगडे हे पुरस्कारांने सन्मानित झाल्याने त्यांचे रावेर यावलचे आमदार अमोल हरिभाऊ जावळे,भारतीय जनता पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष शरद महाजन,उमेश फेगडे,सागर कोळी,उमेश बेंडाळे,यावल कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती दगडू जर्नादन कोळी,सर्व संचालक तसेच कोरपावली विकास सोसायटीचे सर्व संचालक व कोरपावली गावातील समस्त ग्रामस्थ मंडळी यांनी स्वागत केले आहे.