Just another WordPress site

कोरपावली येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्ताने स्पर्धा परीक्षा पुस्तकांचे वाटप !!

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-

दि.३० एप्रिल २५ बुधवार

तालुक्यातील कोरपावली येथे ग्रामपंचायत सरपंच विलास अडकमोल व कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती राकेश फेगडे यांच्या प्रमुख उपस्थितीत भारतरत्न महामानव परमपूज्य डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३४ व्या जयंतीचे अवचित्य साधून विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षा पुस्तकांचे नुकतेच वाटप करण्यात आले.

दरम्यान सरपंच विलास नारायण अडकमोल व गोविंद बहुउद्देशीय संस्था,कोरपावली यांच्या संयुक्त विद्यमाने संस्थाध्यक्ष नारायण अडकमोल यांच्या वतीने गरीब व गरजू मुलांना स्पर्धा परीक्षा व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे जीवन चरित्रावर प्रकाश टाकणाऱ्या पुस्तकांचे नुकतेच वाटप करण्यात आले.याप्रसंगी कोरपावली विविध कार्यकारी सहकारी सोसायटी चेअरमन व यावल कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती राकेश वसंत फेगडे व सामाजिक कार्यकर्ते मुक्तार पटेल यांच्यासह मोठया संख्येत सर्वधर्मीय समाज बांधव उपस्थित होते.सदरहू गोविंद बहूउद्देशीय समाजसेवी संस्था व सरपंच विलास अडकमोल यांच्या वतीने आयोजित या आगळ्या वेगळ्या उपक्रमाचे पंचक्रोशीत विशेष कौतुक करण्यात येत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.