यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
दि.३० एप्रिल २५ बुधवार
तालुक्यातील किनगाव येथील इंग्लिश मिडीयम निवासी पब्लिक स्कूल येथील विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती परीक्षेत उत्कृष्ठ यश संपादन केले असून २०२४-२५ मध्ये घेण्यात आलेल्या शिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला व त्यात दरवर्षाप्रमाणे यावर्षीही शाळेतील विद्यार्थ्यांनी उत्कृष्ठ यश मिळवले आहे.
दरम्यान या परीक्षेत इ.५ वी व इ.८ वीच्या विद्यार्थ्यांची स्कॉलरशिप म्हणून एक परीक्षा घेतली जाते व या परीक्षेत पात्र विद्यार्थ्यांना शासनाकडून शिष्यवृत्ती म्हणून आर्थिक मदतही मिळत असते. यावर्षी इंग्लिश मिडीयम निवासी पब्लिक स्कूल किनगावचे ४ विद्यार्थी शिष्यवृत्ती परीक्षेत पात्र ठरले आहेत.यात इ.५ वीची विद्यार्थिनी इशिता रुपम पाटील तर इ.८ वीचे विद्यार्थी प्रतीक कैलास पाटील,लक्ष्मी योगेश पाटील व मिताली विवेक नेवे यांनी शिष्यवृत्ती परीक्षेत यश संपादन केले आहे.त्यांच्या या यशाबद्दल स्कूलचे चेअरमन विजयकुमार देवचंद पाटील,सचिव मनिष विजयकुमार पाटील,स्व.केतनदादा मल्टीपर्पज फाउंडेशनच्या संचालिका पुनम मनिष पाटील,मुख्याध्यापक अशोक प्रतापसिंग पाटील,उपमुख्याध्यापक सुहास भालेराव व शिक्षक आणी शिक्षकेतर कर्मचारी यांनी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचे कौतुक करत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.