भुसावळ-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
दि.३० एप्रिल २५ बुधवार
येथील न्यू वाल्मिक नगर,रेल्वे उत्तर वार्ड मधील रहिवाशी कामगार नेते गणेश बद्री बारसे यांनी केलेल्या सामाजिक कार्याची दखल घेत त्यांना सार्थक सिद्ध सेवा फाऊंडेशनच्या वतीने डॉ.बाबासाहेब आंबेडकर महाराष्ट्र भुषण पुरस्काराने नुकतेच सन्मानित करण्यात आले आहे.
दरम्यान सार्थक सिद्ध सेवा फाऊंडेशन,नवी दिल्ली यांच्या वतीने भुसावळ येथील असंगठित कामगार नेते तथा मेहतर समाज भुषण पुरस्कार प्राप्त कामगार नेते गणेश भैय्या बारसे यांनी दलित,आदिवासी आणि मेहतर समाजाला न्याय मिळवून त्यांचे संरक्षण करण्यासाठी केलेल्या कार्याची दखल घेऊन केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांच्या मार्गदर्शनाखाली सार्थक सिद्ध सेवा फाऊंडेशनच्या वतीने गणेश बद्री बारसे यांना डॉ.बाबासाहेब आंबेडकर महाराष्ट्र भुषण पुरस्कार फाऊंडेशनच्या अध्यक्षा लक्ष्मीताई कुमावत यांनी देऊन सन्मानित केले. गणेश भैय्या बारसे हे जळगांव जिल्हाध्यक्ष असंघटित कामगार कर्मचारी कांग्रेस,जळगांव जिल्हा अध्यक्ष,ऑल इंडिया सफाई कामगार सेल,राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी युवा जिला अध्यक्ष, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया,(आठवले गट) प्रदेश अध्यक्ष महाराष्ट्र,राष्ट्रीय मजदूर संघ (R.M.S)महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष प्रदेश महासचिव,महाराष्ट्र राज्य मेहतर वाल्मीकि समाज अर्थात बवनी पंचायत,महाराष्ट्र राष्ट्रीय सचिव,अखिल भारतीय वाल्मीकि महापंचायत काशीपुरीआंबेडकर नगर,नई दिल्ली प्रदेश सचिव महाराष्ट्र,अखिल भारतीय गोगामेड़ी विकास समिति (राजस्थान) आनंद नगर,इंद्रलोक दिल्ली जलगांव जिलाध्यक्ष,अखिल भारतीय वाल्मीकि नवयुवक संघ,महाराष्ट्र राज्य जळगाव जिल्हा अध्यक्ष,अखिल भारतीय नवयुवक संघ महाराष्ट्र राज्य रावेर लोकसभा प्रभारी,जळगाव जिल्हा प्रभारी,आक्रमक सामाजिक संघटना अशा विविध सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करीत आहे.सदरहू गणेश बारसे यांना डॉ.बाबासाहेब आंबेडकर महाराष्ट्र भुषण पुरस्कार २०२५ ने सन्मानित करण्यात आल्याने त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे.