यावल-पोलिस नायक (प्रतिनिधी) :-
दि.०२ मे २५ शुक्रवार
येथील यावल तालुका शेतकरी सहकारी खरेदी विक्री संघाचे माजी उपसभापती तथा संचालक तेजस धनंजय पाटील यांना काल दि.०१ मे गुरुवार रोजी महाराष्ट्र दिनानिमित्त महाराष्ट्र राज्य शासनाचा जिल्हा युवा पुरस्कार राज्याचे पाणी पुरवठामंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री ना.गुलाबराव पाटील यांच्या हस्ते व जिल्हाधिकारी आयुष प्रसाद,जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी,जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती मिनल करनवाल,जिल्हा क्रीडा अधिकारी रवींद्र नाईक यासह आदी अधिकारी व मान्यवर यांच्या प्रमुख उपस्थित सदरील पुरस्कार तेजस पाटील यांना प्रदान करण्यात आला.
या पुरस्काराची विशेष बाब म्हणजे मागील ५० वर्षाच्या कार्यकाळात पहिल्यांदाच जिल्हा युवा पुरस्कारासाठी यावल तालुक्यातील युवकाला संधी मिळाली असून यामुळे यावल तालुक्यातील शिरसाड गावासह तालुक्याचे नाव जिल्हा प्रशासनात उंचावले गेले आहे.दरम्यान तेजस पाटील यांना मिळालेल्या पुरस्काराचे रावेर-यावल आमदार अमोल हरिभाऊ जावळे,यावल कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती राकेश फेगडे,यावल तालुका शेतकरी सहकारी खरेदी विक्री संघाचे चेअरमन पांडूरंग सराफ़,जिल्हा परिषद माजी आरोग्य व शिक्षण समिती सभापती रविन्द्र उर्फ छोटू पाटील,भारतीय जनता पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष शरद महाजन,भारतीय जनता पक्षाचे मंडळ अध्यक्ष सागर कोळी,उमेश बेंडाळे,डॉ.सुनिल पाटील यांच्यासह आदी पदाधिकारी यांनी स्वागत केले आहे.