Just another WordPress site

यावल येथे भाजपातर्फे जातनिहाय जनगणनेच्या निर्णयाचे जल्लोषात स्वागत !!

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-

दि.०३ मे २५ शनिवार

तालुका भारतीय जनता पक्षाच्या वतीने पंतप्रधान नरेन्द्र मोदी यांनी देशात जातनिहाय जनगनणेचा निर्णय घेतल्याबद्दल यावल-रावेर मतदार संघाचे आमदार अमोल जावळे यांच्यासह पक्षाच्या पदाधिकारी यांच्या वतीने जोरदार स्वागत करण्यात आले.

दरम्यान काल शहरातील भुसावळ टी पॉईंटवर पक्षाच्या वतीने भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष शरद महाजन,डॉ.कुंदन फेगडे यांच्यासह प्रमुख पदाधिकारी यांच्या उपस्थितीत केन्द्र शासनाने देशातील सर्व जातींच्या नागरीकांच्या जातीनिहाय जनगणनेच्या क्रांतीकारी निर्णयाचे स्वागत करण्यात आले.यावेळी भारतीय जनता पक्षाच्या वतीने शहरातील मुख्य मार्गाच्या भुसावळ टी पॉईंटवर फटाके फोडून मिठाई वाटून जल्लोष साजरा केला.याप्रसंगी यावल कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती राकेश फेगडे,उमेश फेगडे, जिल्हा परिषदचे माजी शिक्षण व आरोग्य सभापती रविन्द्र उर्फ छोटू पाटील,यावल विभागाचे मंडळ अध्यक्ष सागर कोळी,उमेश बेंडाळे,खरेदी विक्री संघाचे संचालक नरेन्द्र नारखेडे,भाजपाचे माजी यावल शहराध्यक्ष निलेश गडे,गोपाळसिंग पाटील,हेमराज उर्फ बाळू फेगडे,शहराध्यक्ष राहूल बारी,नितिन चौधरी यांच्यासह पक्षाचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.