यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
दि.०३ मे २५ शनिवार
तालुक्यातील बुऱ्हाणपुर-अंकलेश्वर राज्य महामार्गावर चिंचोली गावाजवळ रात्री २ ते २.३० वाजेच्या सुमारास गुजरातकडून भुसावळला लग्न संमारभास जाणाऱ्या मंडळीचे वाहन क्र-जी जे ०५ जेई ८०७१ या हुंडाई चारचाकी वाहन चिंचोली-धानोरा रस्त्यादरम्यान कोसळलेल्या मोठया निंबाच्या झाडात घुसल्याने झालेल्या भिषण अपघातात कार मधील चार जण जखमी झाले आहेत.सदर कारमधील कार चालकाच्या शेजारी बसलेल्या व्यक्तिस गंभीर दुखापत झाली असुन त्याची प्रकृती गंभीर असल्याचे कळते.सदरहू ही सर्व मंडळी गुजरात राज्यातील राहणार असल्याचे समजते.
दरम्यान सदरचा अपघात आज दि.३ मे रोजी रात्री अडीच ते तिन वाजेच्या दरम्यान झाल्याचे वृत्त असुन या अपघातातील जखमींना तात्काळ उपचारासाठी जळगाव येथे पाठविण्यात आले असल्याचे सांगितले जात आहे.सदरहू राज्य मार्गाच्या कडेला असलेली मोठमोठी जिवंत झाडे पाडण्याचे प्रकार समोर येत असून हे मोठे जिवंत झाड पडले कसे ? असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे.तर परिसरात अवैध लाकूडतोडे सक्रिय झाले असल्याची शंका वृक्ष प्रेमींकडून व्यक्त करण्यात येत आहे.