कचऱ्याच्या ढीगाऱ्यास लागलेल्या आगी दरम्यान व्यायामशाळा तरुणांचे प्रसंगावधान व नगरपरिषदेच्या सतर्कतेमुळे अनर्थ टळला !!
यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
दि.०३ मे २५ शनिवार
केन्द्र शासनाचा स्वच्छतेबाबतचा उत्कृष्ठ पुरस्कार मिळवलेल्या नगरपरिषदच्या कार्यक्षेत्रात शहरातील यावल तालुका शेतकरी सहकारी खरेदी विक्री संघाच्या आवारात फेकलेल्या कचऱ्याच्या ढीगाराने दोन दिवसापुर्वी अचानक पेट घेतला असता या आवारात असलेल्या स्टार फिटनेस नावाने व्यायामशाळा असुन या व्यायाम शाळेतील तरुणांनी प्रसंगी आग लागल्याचा प्रकार नगरपरिषद प्रशासनास कळविल्याने तात्काळ नगरपरिषदच्या वतीने या ठिकाणी अग्नीबंब पाठविण्यात आल्याने आग विझविण्यात आली.सदरहू याठिकाणी घाणीचे साम्राज्य पसरविणाऱ्यावर कार्यवाही करावी अशी मागणी शहरवासियांकडून करण्यात येत आहे.
या संदर्भातील वृत्त असे की,शहरात यावल तालुका खरेदी विक्री शेतकरी सहकारी संघाच्या संरक्षण भिंतीला लागुन काही लोकांची घरे असुन या ठीकाणी राहणाऱ्यांकडून संघाच्या आवारात बेजबाबदारीने दुर्गंधीचा कचरा फेकण्यात येत आहे.दरम्यान या ठिकाणी फेकलेल्या कचऱ्याच्या ढीगाराने दोन दिवसापुर्वी अचानक पेट घेतला असता या आवारात असलेल्या स्टार फिटनेस नावाने व्यायामशाळा असुन या व्यायामशाळेच्या तरुणांनी प्रसंगावधान राखून आग लागल्याचा प्रकार नगरपरिषद प्रशासनास कळविल्याने तात्काळ नगरपरिषदच्या वतीने या ठिकाणी अग्नीबंब पाठविण्यात आल्याने आग विझविण्यात आली.या कचऱ्याच्या ठिकाणी मागील सहा दिवसात दोन वेळा जिनिंग परिसरातील स्टार फिटनेस व्याम शाळा जवळच्या कचरा ढीगाऱ्याला अचानक आग लागल्याची घटना घडली आहे.तर युवकांनी नगरपरिषदच्या अशा दुर्लक्षी कारभार करणाऱ्या प्रशासनास मागच्या वर्षी स्वच्छतेचा पुरस्कार मिळाला असुन या पुरस्काराचा शहरामध्ये कौतुकास पात्र ठरत होती त्याचा बोरबाजा काही लोकांनी मुद्दाम केल्याची दिसून येत आहे.या ठीकाणी भाजपाचे उमेश फेगडे यांनी नगरपरिषदचे स्वच्छता व आरोग्य अधिकारी सत्यम पाटील यांच्याशी त्वरीत मोबाइलव्दारे संपर्क साधुन संघाच्या आवारात दुर्गंधीचा कचरा फेकणाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी केली आहे.