Just another WordPress site

वादळात पिकाचे नुकसान झालेला एकही शेतकरी पंचनाम्यातुन सुटता कामा नये !! आमदार प्रा.चंद्रकांत सोनवणे यांच्या प्रशासनाला सूचना !!

यावल-पोलिस नायक (प्रतिनिधी) :-

दि.०७ मे २५ बुधवार

तालुक्यात काल सायंकाळच्या सुमारास विविध ठीकाणी वादळी वाऱ्यासह गरपिटच्या पाऊसात केळी व शेती पिकांच्या झालेल्या मोठया नुकसानीची तातडीने पाहणी करण्यासाठी चोपडा मतदार संघाचे आमदार प्रा.चंद्रकांत सोनवणे यांनी आपल्या मतदार संघात भेट देऊन शेती पंचनाम्याच्या सुचना अधिकारी यांना दिल्या व त्यांनी तालुक्यातील किनगाव,उंटावट,डांभुणी या शिवार व आदी गावांना भेट देवुन अवकाळी पाऊसाने झालेल्या नुकसानाची पाहणी केली.

यावेळी नुकसान पाहणीकरीता त्यांच्यासह अप्पर जिल्हाधिकारी अंकुश पिनाटे,प्रांतधिकारी बबनराव काकडे,यावल तहसीलदार मोहनमाला नाझीरकर,निवासी नायब तहसीलदार संतोष विंनते यांच्यासह शिवसेना (शिंदे गट) पक्षाचे कार्यकर्ते कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती दगडू कोळी,सुर्यभान पाटील,भरत चौधरी,कोळन्हावी सरपंच विकास साळुंके,डांभुर्णी सरपंच कल्पना बाविस्कर व आदी अधिकारी व पक्षाचे पदधिकारी मोठया संख्येत उपस्थित होते.दरम्यान आमदार प्रा.चंदकांत सोनवणे यांनी अधिकाऱ्यांनी नुकसान झालेल्या सर्व शेतकऱ्यांचे पंचनामे करण्याचे सुचना दिल्या असुन पंचनाम्यातुन शेती पिकांचे नुकसान झालेला कोणताही शेतकरी सुटता कामा नये किंवा सुटणार नाही याची काळजी घ्यावी असेही त्यांनी अधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.