Just another WordPress site

यावल सानेगुरुजी विद्यालयाने परंपरेनुसार विज्ञान शाखेचा १०० टक्के निकाल कायम राखला !!

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-

दि.०८ मे २५ गुरुवार

येथील नगरपरिषदव्दारे संचलित श्री सानेगुरुजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचा बारावीचा निकाल जाहीर झाला असुन यंदा देखील मुलींनी बाजी मारली आहे.यात विज्ञान शाखेचा शंभर टक्के निकाल लागला असुन विद्यालयाने यशाची परंपरा कायम राखली असून विज्ञान शाखेचा शंभर टक्के निकाल लागलेला आहे.

विविध शाखेतून विद्यालयाचा निकाल पुढीलप्रमाणे लागलेला आहे.यात विज्ञान शाखा एकूण प्रविष्ट विद्यार्थी ९२ व उत्तीर्ण विद्यार्थी ९२ निकाल १०० टक्के तर वाणिज्य शाखा एकूण प्रविष्ट विद्यार्थी ८० उत्तीर्ण विद्यार्थी ७९ निकाल ९८.७५ टक्के तसेच कला शाखा एकूण प्रविष्ट विद्यार्थी १५० उत्तीर्ण विद्यार्थी १०७ निकाल ७१.३३ टक्के असा लागला आहे.सदरहू विद्यालयातून विज्ञान शाखेतून प्रथम राणे नीती किशोर ५२५ गुण ८७.५० टक्के द्वितीय क्रमांक कोलते तन्वी राकेश ५२४ गुण ८६.३३ टक्के तृतीय क्रमांक जोगी अंजली शरद ५१६ गुण ८६ टक्के तर वाणिज्य शाखेतून प्रथम क्रमांक कोळी प्रतीक्षा कैलास ४८५ गुण ८०.८३ गुण द्वितीय क्रमांक महाजन ममता रोहिदास ४८३ गुण ८०.५० टक्के तृतीय क्रमांक वाघ यामिनी नितीन ४५९ गुण ७६.५० टक्के तसेच कला शाखेतून प्रथम क्रमांक सोनवणे उज्वला रमेश ४५३ गुण ७५.५० टक्के द्वितीय क्रमांक चौधरी भाग्यश्री लक्ष्मण ४२८ गुण ७१.३३ टक्के तृतीय क्रमांक भालेराव रिंकू बाळू ४११ गुण ६८.५० टक्के गुण मिळाले.सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे विद्यालयाच्या वतीने कौतुक आणि अभिनंदन करण्यात येत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.