Just another WordPress site

डोंगर कठोरा अ.ध.चौधरी विद्यालयाचा बारावी परीक्षेचा निकाल ७२.२२ टक्के !!

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-

दि.०८ एप्रिल २५ गुरुवार

तालुक्यातील डोंगर कठोरा येथील अच्युत धनाजी चौधरी विद्यालय व ज्यु.कॉलेजचा इ.१२ वी फेब्रुवारी/मार्च २०२५ परीक्षेचा निकाल ७२.२२ लागला असून सदर परीक्षेत  प्रथम क्रमांक आरती संदीप कुंभार ७१.१७ टक्के गुण,द्वितीय क्रमांक रिया युवराज पाटील ७०.३३ टक्के गुण व तृतीय क्रमांक वसीम मनोज तडवी ६७.६७ टक्के गुण यांना मिळाला आहे.

सदरहू यशस्वी विद्यार्थ्यांना अध्यक्ष डॉ.राजेंद्रकुमार झांबरे,संचालक शरद राणे,सुदाम राणे,एम.ओ.चौधरी यांच्यासह इतर संस्थाचालक तसेच मुख्याध्यापक नितीन झांबरे, उपशिक्षक प्रा.नंदन वळिंकार,प्रा.रामेश्वर जानकर,प्रा.नयना पाटील यांचे मार्गदर्शन लाभले.दरम्यान शाळेच्या व विद्यार्थ्यांच्या यशाबद्दल ग्रामस्थांकडून शाळेचे व विद्यार्थ्यांचे अभिनंदन व कौतुक केले जात आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.