Just another WordPress site

डोंगर कठोरा चौधरी विद्यालयात सन २०२५-२६ या शैक्षणिक वर्षांपासून सेमी इंग्लिश अभ्यासक्रमास मान्यता !!

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-

दि.०८ मे २५ गुरुवार

तालुक्यातील डोंगर कठोरा येथील अच्युत धनाजी चौधरी विद्यालय व ज्यु.कॉलेजला यंदापासून म्हणजेच सन २०२५-२६ या शैक्षणिक वर्षांपासून इयत्ता ५ वी पासून प्रथमच सेमी इंग्लिश अभ्यासक्रमाला शिक्षण विभाग विभागीय आयुक्त नाशिक यांच्याकडून मान्यता मिळाली असल्याचे पत्र शाळेला प्राप्त झाले असल्याची माहिती मुख्याध्यापक नितीन झांबरे यांनी नुकतीच पोलीस नायक प्रतिनिधीशी बोलतांना दिली आहे.सदरील सेमी इंग्लिश अभ्यासक्रमाच्या मान्यतेमुळे गावातील विद्यार्थ्यांना आपल्या गावातच सेमी इंग्लिश माध्यमाचे शिक्षण घेणे सोईचे होणार असून अनेक वर्षांपासून गावात सेमी इंग्लिश अभ्यासक्रम नसल्यामुळे अनेक विद्यार्थ्यांना सेमी इंग्लिश माध्यमाच्या शिक्षणाकरिता बाहेरगावी जावे लागत होते.यात पैशांचा मोठ्या प्रमाणात अपव्यय तसेच प्रवासाचा नाहक त्रास विद्यार्थी व पालकांना सहन करावा लागत होता.परंतु आता गावातच सेमी इंग्लिश माध्यमाचे शिक्षण सुरु झाल्यामुळे पालक व विद्यार्थ्यांचा हा सर्व त्रास कमी होणार आहे यामुळे गावात व परिसरात आनंद व्यक्त करण्यात येत आहे.

दरम्यान सन २०२५-२६ या शैक्षणिक वर्षांपासून इयत्ता ५ वी पासून सेमी इंग्लिश अभ्यासक्रमाला मान्यता मिळविण्याकामी अध्यक्ष डॉ.राजेंद्रकुमार झांबरे,उपाध्यक्ष राजाराम राणे,सचिव डी.के.पाटील,संचालक शरद राणे,सुदाम राणे,एम.ओ.चौधरी,चिंधू झांबरे,प्रमोद झांबरे यांच्यासह मुख्याध्यापक नितीन झांबरे यांनी परिश्रम घेतले.तरी यंदापासून सेमी इंग्लिश अभ्यासक्रम माध्यमातून आपल्या शाळेला मान्यता मिळाली असून “आपले गाव आपली शाळा” या योजनेअंतर्गत गावातील व परिसरातील पालकांनी आपल्या पाल्यांचा (विद्यार्थ्यांचा) ५ वी च्या वर्गात प्रवेश घेऊन आलेल्या संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन मुख्याध्यापक नितीन झांबरे यांनी केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.