मुंबई-पोलीस नायक(प्रतिनिधी):-
कल्याणमध्ये एक विचित्र घटना नुकतीच समोर आली आहे.यामध्ये पोलिसांनी सासूला धडा शिकविण्यासाठी आपल्या मित्रासोबत मिळून स्वत:च्या अपहरणाचा बनाव करणाऱ्या जावयाला कोळसेवाडी पोलिसांनी अटक केली आहे.संदीप गायकवाड असे या आरोपी तरुणाचे नाव आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की,कल्याण पूर्व भागातील तिसगाव नाका परिसरात संदीप गायकवाड हा तरुण राहतो.त्याला एकूण दोन बायका आहेत त्या वेगवेगळ्या धर्माच्या आहेत.मात्र दुसऱ्या पत्नीच्या आईला संदीप आवडत नसल्याने संदीप आणि त्याच्या दुसऱ्या पत्नीमध्ये भांडण होत होते.यानंतर या रोजच्या भांडणाला वैतागून संदिपची दुसरी पत्नी संदीपला सोडून निघून गेली.यानंतर संदीपने तिचा खूप शोध घेतला मात्र ती कुठेच मिळाली नाही दुसरी पत्नी तिच्या आईमुळेच निघून गेली आहे हा राग संदिपच्या मनात होता त्यामुळे त्याने आपल्या सासूला अडकवण्यासाठी अपहरणाचा हा सगळा बनाव रचला.त्यानुसार आपल्या तीन साथीदारांसोबत संदिपने कल्याण कोळशेवाडी परिसरात आपल्या मित्रांकडून आधी मारहाण करत रस्त्यावर खरेच अपहरण होत असल्याचे चित्र तयार केले.त्यानंतर बुरखा घालून कोळशेवाडीतून पळ काढत शहापूरमधील एका गावात पाच दिवस मुक्काम ठोकला.यादरम्यान संदिपच्या पहिल्या पत्नीने कल्याण कोळशेवाडी पोलीस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल केला.यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास केला असता संदिपचे खरोखरच अपहरण झाल्याचे प्राथमिकदृष्ट्या समोर आले.पोलिसांनी अधिक तपास करत घटनास्थळाचे सिसिटीव्ही फुटेज तपासले.यानंतर पोलिसांनी घटनेतील रिक्षाचा शोध काढत रिक्षा चालकाला ताब्यात घेत खाकीचा धाक दाखवत विचारपूस केली.यानंतर त्या रिक्षाचालकाने धक्कादायक खुलासा करत हा सर्व प्रकार एक बनाव असल्याचा सांगत संदीप आणि त्याच्या मित्राची पोलखोल केली आहे.यानंतर पोलिसांनी शहापूरमधून संदीप गायकवाड याच्यासह त्याचे साथीदार जावेद खान,आकाश अभंग आणि अवि पाटील यांना ताब्यात घेत पुढील तपासाला सुरुवात केली आहे.