यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
दि.०९ मे २५ शुक्रवार
येथील नगर परिषदच्या कार्यक्षेत्रात गेल्या काही दिवसांपासुन दुर्गंधीयुक्त पिळसर अशुद्ध पाणीपुरवठा करण्यात येत आहे तसेच नगर परिषदेच्या दुर्लक्षित कारभारामुळे शहरात अस्वच्छता पसरली असुन विविध ठिकाणी घाणीच्या पाण्यामुळे गटारी तुंबलेल्या आहेत.सदरहू पावसाळ्यापुर्वी सदरील गटारींची स्वच्छता करण्यात यावी तसेच विविध समस्यांमुळे शहरवासीयांच्या आरोग्यास धोका निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नसुन प्रशासनाने या विषयाकडे तातडीने लक्ष देवुन या नागरी समस्या मार्गी लावाव्यात अशा मागणीचे निवेदन नगर परिषद प्रशासनाला शिवसेना (उबाठा)च्या वतीने नुकतेच देण्यात आले आहे.
या संदर्भात शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे गट) पक्षाच्या वतीने यावल शहरातील विविध समस्यांविषयी नगर परिषदचे मुख्यधिकारी निशिकांत गवई यांना लिखित निवेदनाद्वारे तक्रार करण्यात आली असुन या निवेदनात त्यांनी म्हटले आहे की,यावल नगर परिषदच्या माध्यमातुन गेल्या काही दिवसांपासुन नागरीकांना पिळसर रंगाचा अशुद्ध दुर्गंधीचा पाणीपुरवठा नळाव्दारे करण्यात येत असून हे पाणी नागरीकांच्या आरोग्यास धोका निर्माण करणारे आहे तसेच शहरातील बोरावल गेट ते भुसावळ नाका या मागीवरील रस्त्याचे डांबरीकरण करण्यात यावे तसेच पावसाळयापुर्वी शहरातील विविध ठिकाणी असलेले नाले व दुर्गंधीयुक्त सांडपाण्याने तुंबलेल्या गटारी सफाई करावी अशा मागणीचे निवेदन नगरपरिषदेला नुकतेच देण्यात आले आहे.तर प्रशासनाने तात्काळ या तक्रारीची दखल न घेतल्यास शिवसेना (उबाठा) पक्षाच्या माध्यमातुन आंदोलन छेडण्यात येईल असा ईशारा ही देण्यात आला आहे.सदरील निवेदनावर जगदीश कवडीवाले,संतोष धोबी,शरद कोळी,हुसेन तडवी,अजहर खाटीक,पप्पु जोशी, प्रकाश वाघ,पिंटू कुंभार,सुनिल बारी,सारंग बेहडे,योगेश चौधरी,प्रविण लोणारी,योगेश राजपूत,चिंधु कुंभार यांच्याशिवाय आदी शिवसेना (उबाठा) चे पदधिकारी यांच्या स्वाक्षरी आहेत.