चोपडा-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
दि.१० मे २५ शनिवार
येथील पोलीस नायक वृत्तपत्राचे तालुका प्रतिनिधी व भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे सरचिटणीस तसेच अनवर्दे खुर्द ता.चोपडा येथील माजी ग्रामपंचायत सदस्य महेश रामराव बोरसे यांचे शालक धुळे जिल्ह्यातील बोरकुंड येथील रहिवासी लिलाधर देविदास भदाणे यांनी नुकत्याच झालेल्या एमपीएससी परीक्षेत यश मिळविल्याबद्दल त्यांची सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी कार्यालयात नुकतीच महसूल सहाय्यक अधिकारी म्हणून निवड करण्यात आली आहे.
दरम्यान कोकणात सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी कार्यालयात महसूल सहाय्यक अधिकारी म्हणून नियुक्ती झाल्याबद्दल त्यांचा चोपडा येथील पोलीस नायक वृत्तपत्राचे तालुका प्रतिनिधी व भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे सरचिटणीस तसेच अनवर्दे खुर्द ता.चोपडा येथील माजी ग्रामपंचायत सदस्य महेश रामराव बोरसे यांच्या पारिवारिक भेटीदरम्यान लिलाधर भदाणे यांचा पारिवारिक वातावरणात शाल,श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन यथोचित सत्कार करण्यात आला.लिलाधर भदाणे हे चोपडा तालुक्यातील अनवर्दे खुर्द येथील माजी ग्रामपंचायत सदस्य महेश रामराव बोरसे यांचे शालक असून महसूल सहाय्यक अधिकारी म्हणून निवड झाल्याबद्दल लिलाधर भदाणे हे त्यांचे मेहुणे व बहिणीला खास भेटण्यासाठी आले असता त्यांचा सत्कार पारिवारिक तसेच ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आला.सदरहू लीलाधर भदाणे यांच्या महसूल सहाय्यक अधिकारी निवडीबद्दल त्यांचे पारिवारिक,कौटुंबिक,मित्रमंडळी तसेच विविध स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे.