यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
दि.११ मे २५ रविवार
तालुक्यातील परसाडे येथे ग्रामपंचायत आणि आस बहुउद्देशीय संस्था भुसावळ यांच्या संयुक्त विद्यमाने आदिवासी तडवी भिल समाजाचा सामूहिक विवाह सोहळा काल दि.१० मे शनिवार रोजी मोठ्या थाटामाटात संपन्न झाला.सदरील सामूहिक सोहळ्यास दुसरे वर्ष असून समाज बांधवांचा या कार्यक्रमाला मोठा प्रतिसाद मिळाला.या विवाह सोहळ्यात १४ जोडपी विवाहबद्ध झाली व या कार्यक्रमास महाराष्ट्र सह गुजरात व मध्य प्रदेशातील आदिवासी समाजबांधव मोठ्या संख्येने या सोहळ्यास उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या सुरूवातीस पहेलगाम (जम्मु काश्मिर) या ठीकाणी शहिद जवान व नागरिकांना भावपूर्ण श्रध्दांजली अर्पण करून आलेल्या पाहुण्यांचे शब्दसुमनाने स्वागत करण्यात आले.याप्रसंगी रावेर-यावल विधानसभा मतदारसंघाचे आ.अमोल हरिभाऊ हरिभाऊ जावळे,गोदावरी फाउंडेशन जळगावच्या संचालिका डॉ.केतकी पाटील,एकात्मिक आदिवासी विकास विभागाचे प्रकल्प अधिकारी अरूण पवार यांनी सोहळ्यास उपस्थित राहून वधूवरांना आशीर्वाद दिले.याप्रसंगी सर्व १४ जोडप्यांना प्रत्येकी गादी-पलंग व ४५ संसार उपयोगी भांडी देण्यात आले.यावेळी जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी वाहेद ए.तडवी,रशिद एस तडवी रि.डीवायएसपी, दिलदार बी.तडवी ए.एस.आय,बुलडाणा,जलदार बी.तडवी पाणी पुरवठा अधिकारी,नामदार बी.तडवी आरोग्य विभाग,जि.प.जळगाव हबीब.एन.तडवी विस्तार अधिकारी प.स.यावल,राजू अमिर तडवी शिक्षणाधिकारी,बृहन्मुंबई,रज्जाक तडवी सरपंच धानोरा,मुस्तुफा तडवी व रजियाताई तडवी सरपंच,मोहमांडली,हाजी रमजान तडवी सरपंच मोहरद,मन्सूर तडवी पत्रकार,अँड.सिकंदर सुभान तडवी भुसावळ,अहमद जबरा तडवी,कु.माया तडवी पर्यवेक्षिका ठाणे,मुनाफ जुम्मा तडवी, रशिद तडवी,हुसेन तडवी,फिरोज तडवी,हजरा तडवी जळगाव,युनुस तडवी आ.विकास विभाग,राकेश वसंत फेगडे सभापती,कृ.उ.बा.स.यावल,हर्षल पाटील संचालक,कृ.उ.बा.स,रहिमान कालू तडवी मुख्याध्यापक,सिंधुदुर्ग,दगेखा शावका तडवी,सेवानिवृत सहाय्यक फौजदार,सकावत तडवी तससिल,यावल,भूषण गुरुजी यावल,निजाम तडवी सेवानिवृत्त पोलिस उपनिरिक्षक बदलापूर,अजित हुसेन तडवी (तडवी कृती समिती),सचिन तडवीनायगाव,राजू तडवी भालोद आदी मान्यवर उपस्थित होते.या कार्यक्रमासाठी परसाडे ग्रामपंचायतीचे सरपंच,उपसरपंच,सर्व सदस्य,सर्व ग्रामस्थ बांधवांनी महत्वाचे परिश्रम घेत आलेल्या मान्यवरांनी परसाडे गावातील नागरिकांचा या कार्यक्रमात सहकार्य केल्याबद्दल शब्दसुमनांनी आभार व्यक्त केले.