Just another WordPress site

यावल शहरातील सराफा दुकान फोडण्याचा चोरट्यांचा असफल प्रयत्न !! चार संशयित सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद !!

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-

दि.११ मे २५ रविवार

शहरातील प्रमुख मार्गावरील मेन रोडवर चावडीच्या पुढे वर्दळीच्या ठिकाणी असलेल्या लक्ष्मी ज्वेलर्स या सोन्या-चांदीच्या दुकानाचे चार अज्ञात चोरट्यांनी आज दि . ११ मे रविवार रोजी पहाटेपूर्वी शटरचे कुलूप तोडले मात्र आत चैनल गेट असल्याने त्यांचा चोरीचा प्रयत्न फसला.दरम्यान याच दुकानचे काही अंतरावर असलेल्या एका बंद घराचे कुलूप देखील त्यांनी तोडले मात्र तेथेही काही हातात मिळाले नाही.यापूर्वी याच मेन रोडवर एका दवाखान्यात अशाच पद्धतीने चोरी करण्यात आली होती व आता या सराफा व्यावसायिकाच्या दुकानात चोरीचा प्रयत्न झाल्याने शहरात खळबळ उडाली आहे.दरम्यान चोरीच्या प्रयत्नाची ही घटना सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली असून याप्रकरणी यावल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान यावल शहरात मेन रोडवर चावडीच्या पुढे लक्ष्मी ज्वेलर्स नामक नितीन दिनकर रणधीरे यांचे दुकान असून या दुकानाचे शटरचे कुलूप आज रविवारी पहाटेपूर्वी चार वाजेच्या सुमारास एका दुचाकीवर आलेल्या चार अज्ञात चोरट्याने तोडले.आत चैनल गेट असल्याने त्यांचा चोरीचा प्रयत्न फसला.या गुन्ह्यात वापरलेली दुचाकीचा क्रमांक एम.एच.१९ डी.एल.९७५७ असा सीसीटीव्ही कॅमेऱ्यात दिसून आला असून चार जण सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहे.सदरहू येथे चोरीचा प्रयत्न फसल्यानंतर या चोरट्यांनी आपला मोर्चा या भागातील कांचन श्रीराम सराफ यांच्या घराकडे वळवला व त्यांच्या घराला कुलूप होते.यावेळी कुलूप तोडून त्यांनी आत प्रवेश केला मात्र घरामध्ये चोरी करणे योग्य काहीच नव्हते म्हणून ते तिथून पसार झाले.ही घटना रविवारी उघडकीस आल्यानंतर तातडीने पोलिसांना माहिती देण्यात आली पोलीस निरीक्षक प्रदीप ठाकूर,उपनिरीक्षक सुनील मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक फौजदार विजय पाचपोळे,हवालदार निलेश चौधरी यांनी या ठिकाणी येऊन पंचनामा केला आहे.याप्रकरणी यावल पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस हवालदार निलेश चौधरी करीत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.