भारत पाकिस्तान युद्धजन्य परिस्थितीमुळे केंद्र सरकारने सर्वच जवानांच्या सुट्ट्या रद्द केल्या आहेत व त्यामुळे अनेक जवानांवर लग्न,वाढदिवस यासारखे कौटुंबिक कार्यक्रम अर्धवट सोडून परत सीमेवर देशरक्षणाकरिता येण्याची वेळ आली आहे.
-

जवान पुन्हा सीमेवर
भारत पाकिस्तान युद्धजन्य परिस्थितीमुळे केंद्र सरकारने सर्वच जवानांच्या सुट्ट्या रद्द केल्या आहेत.
-
2/8लग्नाच्या दुसऱ्या दिवशी ड्युटीवर !!
- अनेक जवानांवर लग्न,वाढदिवस यासारखे कौटुंबिक कार्यक्रम अर्धवट सोडून परत येण्याची वेळ आली.
-
3/8लग्न लागले अन बोलावणे आले !!
सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्यात असलेल्या काळेवाडी गावातील प्रसाद काळे या जवानाचे नुकतेच लग्न झाले. इतक्यात युनिटमधून फोन आला आणि प्रसादला निघावं लागलं
-
4/8हळदीच्या ओल्या अंगाने निघाला
दुर्दैवाने हळदीच्या ओल्या अंगाने प्रसाद ऑपरेशन सिंदूरसाठी सीमेवर रवाना झाला आहे. त्याच्या पत्नीने स्वतःच्या आनंदापेक्षा देशाच्या सुरक्षेला प्राधान्य दिले.
-
5/8आधी देशसेवा मग कुटुंब
आधी देश सेवा आणि नंतर कुटुंब असे सांगत प्रसादला देशसेवेसाठी सीमेवर जाण्यास परवानगी दिली आहे.
-
6/8प्रसादची पत्नी
सातारा जिल्हा हा सैनिकांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो.साताऱ्याने अनेक जवान भारत मातेच्या संरक्षणासाठी दिले आहेत.
-
7/8सुट्ट्या रद्द
भारत पाकिस्तान युद्धजन्य स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे सुट्टीवर असलेल्या सर्व जवानांना तत्काळ बोलवण्यात आले आहे.
-
8/8कुटुंबाचा हसत निरोप
आधी देश सेवा आणि नंतर कुटुंब,पत्नीने स्वतःच्या आनंदापेक्षा देशाच्या सुरक्षेला प्राधान्य दिले.