Just another WordPress site

“शेतकरी योजनांची माहिती तालुका कृषी अधिकाऱ्यांनाच नसेल तर मग शेतकऱ्यांनी जायचे कुणाकडे ?” आ.अमोल जावळे यांनी उपस्थित केला प्रश्न

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-

दि.१२ मे २५ सोमवार

तालुका पातळीवरील खरीप हंगाम २०२५-२६ या वर्षाकरिताच्या पेरणी पुर्व शेती नियोजना संदर्भातील बैठक चोपडा मतदार संघाचे आमदार प्रा.चंद्रकांत बळीराम सोनवणे व रावेर-यावल मतदार संघाचे आमदार अमोल हरीभाऊ जावळे यांच्या प्रमुख उपस्थितीत यावल तालुक्यातील शेतकरी बांधवांसाठी आज दि.१२ मे सोमवार रोजी बैठकीचे आयोजीन करण्यात आले.दरम्यान शेतकरी व कृषी विभागाचे अधिकारी यांच्यात संपर्क व समन्वयाचा आभाव असल्याने शेतकरी व त्यांचे शेती प्रश्न वाऱ्यावर असल्याचे चित्र या बैठकीदरम्यान पाहायला मिळाले.परिणामी सदरील विचित्र प्रश्नाबाबत रावेर आमदार अमोल जावळे आणि चोपडा आमदार चंद्रकांत सोनवणे या दोन्ही आमदारांनी कृषी अधिकारी व त्यांच्या कारभाराविषयी प्रचंड नाराजी व्यक्त केली.

सदरची बैठक तहसील कार्यालयाच्या ईमारतीत आज दि.१२ मे सोमवार रोजी सकाळी १० वाजता संपन्न झाली.सदर बैठकीला फैजपुर विभागाचे प्रांतधिकारी बबनराव काकडे,यावल तहसीलदार मोहनमाला नाझिरकर,पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी डॉ.मंजुश्री गायकवाड (बोरसे)यांच्या उपस्थितीत पडली.या शेतकरी बांधवांसाठी खरीप हंगामाच्या शेतीपुर्वी मार्गदर्शन व नियोजन बैठकीला तालुका कृषी अधिकारी भरत वारे व त्यांच्या विभागाचे अधिकारी यांची शेतकरी बांधवांनी शेती संदर्भातील बोगस बियाणे व आदी पिक पेरणी बाबतच्या प्रश्नांची उत्तर देण्यास असमर्थ दिसुन आल्याने शेतकऱ्यांनी संत्पत भावना व्यक्त केल्या.तर आमदार अमोल जावळे व आमदार प्रा.चंद्रकांत सोनवणे यांनी कृषी अधिकारी यांना चांगलेच धारेवर धरले.सदरील बैठकीला यावल कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती राकेश फेगडे,भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष शरद महाजन,भाजपाचे जेष्ठ पदधिकारी हिरालाल चौधरी,जिल्हा परिषदचे माजी शिक्षण व आरोग्य सभापती रविंद्र उर्फ छोटू पाटील,माजी यावल कृउबाचे सभापती नारायण चौधरी,मंडळ अध्यक्ष सागर कोळी,उमेश बंडाळे,भाजपाचे तालुका सरचिटणीस विलास चौधरी,उज्जैनसिंग राजपुत,शिवसेनेचे तुषार उर्फ मुन्ना पाटील, भरत चौधरी,सुर्यभान पाटील,तालुक्यातील सवऀ शेतकरी,महायुतीचे सर्व पदाधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.