Just another WordPress site

“पाकिस्तान भारतात घ्यावा” !! जर सैनिक कमी पडले तर बच्चू कडू तयार !! प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू यांचे वक्तव्य !!

अमरावती-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-

दि.१२ मे २५ सोमवार

पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर ‘ऑपरेशन सिंदूर’ रावबत भारताने दहशतवाद्यांना चोख प्रत्युत्तर दिले असून भारताने केलेल्या या कारवाई विरोधात पाकिस्तानने ड्रोन,क्षेपणास्त्र डागून कुरापती करण्यास सुरुवात केली होती पण पाकिस्तानचा प्रत्येक वार भारताने नष्ट केला.तीन दिवस चाललेल्या तीव्र संघर्षानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यात शनिवारी शस्त्रविरामावर सहमती झाली. पाकिस्तानकडून शस्त्रविरामाचा प्रस्ताव आल्यावर ही सहमती लागू करण्यात आल्याची माहिती परराष्ट्र मंत्रालयाने दिली.भारत-पाकिस्तानच्या युद्धविरामानंतर प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी केलेले वक्तव्य चांगलेच चर्चेत आले आहे.नेहमी-नेहमी पाकिस्तानचे वार सुरू असतात व पाकिस्तानचे नेहमीचे दुखणे बंद केले पाहिजे.जसा इंदिरा गांधी यांनी बांगलादेश वेगळा काढला तसाच पाकिस्तान भारतात घ्यावा अशी मागणी बच्चू कडू यांनी केली आहे.तर त्यासाठी जर सैनिक कमी पडत असतील तर प्रहारचा कार्यकर्ता आणि बच्चू कडू तयार आहे असेही त्यांनी म्हटले आहे.बच्चू कडू यांच्या वक्तव्याची आता जोरदार चर्चा चर्चिली जात आहे.

दरम्यान गेल्या काही दिवसांपासून दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे याबाबत विचारले असता बच्चू कडू म्हणाले की,असे झाले तरी जनतेचे काय भले होणार आहे ? राष्ट्रवादी कधी वेगळी होती ? पवार साहेब आणि अजित दादा हे वेगळे होते हे शक्य आहे का ? ते एकत्रच होते.मीडियासमोर आणि लोकांसमोर नव्हते मात्र ते एकत्रच होते असा दावा त्यांनी केला आहे.बच्चू कडू पुढे म्हणाले की,दोन जूनला आमचे आंदोलन सुरू होईल आणि ३ जूनला आमची बारामतीत सभा होईल.तीन तारखेला पंकजा मुंडे,चार तारखेला बाळासाहेब पाटील,पाच तारखेला संजय राठोड यांच्या घरासमोर आंदोलन होणार आहे तर सात जूनला राज्याभिषेकाच्या दिवशी आम्ही नागपूरकडे आगेकूच करणार आहोत.देवेंद्र फडणवीस यांच्या घरासमोर आमचे मुक्कामी आंदोलन राहील.कोरोना काळात ताट वाजवले होते त्यामुळे ताट वाजवून आंदोलन करणार आहोत.त्यांनी जे बोलले होते त्याची आठवण करून देण्यासाठी ताट वाजवणार आहोत कारण ते विसरले आहेत.बावनकुळे म्हणतात पाच वर्षात आम्ही कधीही कर्जमाफी करू तर जनतेला फसवण्याचे काम हे सरकार करत आहे.वेळ पडली तर आम्ही गुन्हे दाखल करून कोर्टात जाऊ असे त्यांनी म्हटले आहे.तसेच लाडक्या बहिणीला २१०० रुपये देणार असल्याची घोषणा निवडणुकीआधी केली पण अजून पंधराशे रुपयांवरच लाडक्या बहिणींना खुश ठेवले जात आहे.सरकारला लाडका शब्द हा कडवट होत आहे.लाडक्या बहिणींवर आणि लाडक्या शेतकऱ्यांवर राज्य सरकारचे लक्ष नाही.शेतकऱ्यांच्या मागणीसाठी बारामतीतून आंदोलन करणार आहोत.बारामतीतून सुरुवात करतोय कारण अर्थखाते बारामतीत आहे आणि ते म्हणतात अर्थ नाही.आम्ही त्यांना सांगणारा आहोत की अर्थ कसे निर्माण केले जाते.आमच्या जवळून घेतलेले पैसे आम्हाला परत जरी केले तरी आमच्या सर्वांचे कर्ज माफ होऊ शकते.कर्जमाफीसाठी ३५ ते ४० हजार कोटी रुपये पाहिजेत व यातून शेतकरी आणि दिव्यांगांचे कर्ज माफ होऊ शकते असेही बच्चू कडू यांनी म्हटले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.