Just another WordPress site

बौद्ध पौर्णिमेनिमित्त आयोजित वन्य प्रेमींकडून यावल वनविभागात ४९२ वन्यजीवांची प्रगणना !!

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-

दि.१४ मे २५ बुधवार

यावल प्रादेशिक वन विभागाच्या वतीने १२ मे सोमवार बौद्ध पौर्णिमेनिमित्ताने यावल वनविभागातील चोपडा,रावेर व यावल तालुक्यातील वन परिक्षेत्रात वन्य प्राण्यांची गणना करण्यात आली.दरम्यान  वनविभागाच्या वतीने रावेर,यावल व चोपडा तालुक्यातील वनपरिक्षेत्रात प्राणी प्रगणनेसाठी ३९ मचाण उभारण्यात आले होते तर प्रत्येक मचानावर तीन ते चार व्यक्तींची बसण्याची व्यवस्था करण्यात आली होती.या प्राणी प्रगणनेदरम्यान विविध २७ प्रकारच्या ४९२ वन्यजीवांची वन्यप्रेमींनी नोंद घेतली आहे.

दरम्यान रावेर,यावल व चोपडा तालुक्याच्या सातपुडा पर्वतामध्ये यावल प्रादेशिक वन विभागाने दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा १२ मे रोजी बौद्ध पौर्णिमेचे दिवशी वन्यजीवांची प्रगणना करण्यासाठी वनविभागात ठिक ठिकाणी ३९ मचान उभारले होते.यात रात्री रात्रीच्या प्रकाशात निसर्गानुभव घेत असतांना प्राणीगणनेसाठी आलेल्या निसर्गप्रेमी,पर्यावरण प्रेमी,वन अधिकारी व कर्मचारी तसेच विविध विभागाचे अधिकारी व कर्मचारी यांनी रानमांजर,चिंकारा,चौसिंगा,काळवीट,साळींदर,घुबड,वटवाघुळ,रातवा भारद्वाज,सातभाई,बुलबुल,बगळा,किंगफिशर,टिटवी,अजगर,राॅबीन,पानदिवड (साप) असे २७ पेक्षा जास्त वन्यजीवांच्या प्रजातीची नोंद निसर्गप्रेमी व पर्यावरण प्रेमींनी करत वनातील रात्रीच्या थराराचा अभिप्राय नोंदविला.यावल प्रादेशिक वनविभागात एकूण ४९२ वन्य प्राणी व पक्षी यांची नोंद करून निसर्गप्रेमींनी व पर्यावरण प्रेमींनी यांनी त्यांचा अभिप्राय नोंदविला.सदर प्राणी प्रगणनेसाठी वन्य प्रेमींनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे.या निसर्ग अनुभव कार्यक्रमासाठी अतिरिक्त पोलीस अधीक्षक अशोक नखाते,जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कुर्बान तडवी,सहाय्यक वन संरक्षक (यावल ) समाधान पाटील,रावेर तहसीलदार बंडू कापसे,मानद वन्यजीव रक्षक रवींद्र फालक, वन्यजीव अभ्यासक अमन गुजर तसेच यावल वनविभागातील क्षत्रिय अधिकारी व कर्मचारी यांचे सह विविध संस्थेचे पदाधिकारी,महाविद्यालयीन प्राध्यापक ,विविध विभागाचे अधिकारी व कर्मचारी असे १५० पेक्षा जास्त जणांनी सहभाग नोंदविला.

यात यावल प्रादेशिक वनविभागातील रावेर वनक्षेत्रात काही वन्यप्रेमींना बिबटचे दर्शन देखील घडले आहे तर वैजापूर वनक्षेत्राच्या पाऊल वाटेवर बिबटचे पाऊल खुणा आढळल्या.यावल प्रादेशिक जंगलातून जाताना केवळ समृद्ध वनाचे दर्शनच नाही तर वनातील अधिवास करणारे विविध पशुपक्षी,फुले व निसर्ग संपदा देखील दिसून आल्या.सदरील कार्यक्रमाचे नियोजन वन संरक्षक धुळे श्रीमती निनु सोमराज,उपवन संरक्षक,उपवनसंरक्षक यावल वनविभाग जमीर शेख,सहाय्यक वनसंरक्षक चोपडा प्रथमेश हडपे,सहाय्यक वनसंरक्षक यावल समाधान पाटील यांचे मार्गदर्शनाखाली वनविभागातील वनपरिक्षेत्र अधिकारी,वनपाल,वनरक्षक यांनी केले.दरम्यान ढगाळ वातावरण व पावसाची शक्यता असतांना प्राणी गणनेत अडथळा निर्माण होईल असे वाटत असतांनाच वन्यजीव वन्य जीव प्रेमी व पर्यावरण प्रेमी यांना यावेळी निसर्गाचे विविध रूप अनुभवास मिळाले तसेच अचानक बदललेल्या वातावरणामुळे वन्यपक्षी वन्य पशुपक्षी यांचे वेगवेगळे स्वभाव जवळून अनुभवायला मिळाला तर बऱ्याच जणांना निसर्ग अनुभव घेतांना थराराची परिस्थिती आल्याची देखील प्रतिक्रिया प्राप्त झाली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.