Just another WordPress site

डांभुर्णी सप्तशृंगी पतसंस्थेचा रौप्य महोत्सव विविध मान्यवरांच्या उपस्थितीत साजरा !!

यावल-पोलीस नायक (प्रतिनीधी) :-

दि.१५ मे २५ गुरुवार

तालुक्यातील डांभुर्णी येथील सप्तशृंगी ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्थेला २५ वर्षे पूर्ण झाल्याने रौप्य महोत्सव नुकताच साजरा करण्यात आला.सप्तशृंगी पतसंस्थेची स्थापना दि.१० मे २००० साली पतसंस्थेचे संस्थापक चेअरमन सोनू गोमा भंगाळे यांनी डांभुर्णी गावातील ग्रामस्थ मंडळीच्या सहकार्याने या पतसंस्थेची उभारणी केली.सुरुवातीला विविध कार्यकारी सह.सोसायटीच्या छोट्याशा खोलीत संस्था सुरू करण्यात आली त्यानंतर दिवसेंदिवस संस्थेचे कामकाज उत्कृष्टपणे होत जात कालांतराने संस्थेने स्वतःची जागा घेऊन इमारतीचे बांधकाम केले.आज रोजी पत संस्था स्वतःच्या जागेवर कार्य करीत आहे.संस्थेचे स्वतःचे गोडाऊन व दुकाने असून संस्थेने सभासदांकरिता व परिसरातील जनतेकरीता स्वर्गरथ,शवपेटी व पाण्याचे टँकर उपलब्ध करून दिले आहे.संस्थेच्या या यशस्वी वाटचालीत सभासद ठेवीदार यांनी ठेवलेला विश्वास व कर्जदार सभासद यांनी वेळोवेळी कर्जाचा भरणा करून संस्थेचा व्यवसाय वाढविण्यास केलेली मदत ही मोलाचे ठरले व आजही सर्वांचा विश्वास पतसंस्थेवर कायम आहे.

दरम्यान पतसंस्थेने आयोजित केलेल्या या रौप्य महोत्सव कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी आ.रमेश विठ्ठल चौधरी तर प्रमुख पाहुणे म्हणून रावेर यावल विधानसभा मतदारसंघाचे आमदार अमोल हरिभाऊ जावळे,भाजपा जिल्हा उपाध्यक्ष शरद जिवराम महाजन,नरेन्द्र नारखेडे,माजी जिल्हा परिषद सदस्य आर.जी पाटील,डॉ.दिवाकर खंडू चौधरी विद्यालयाचे चेअरमन डॉ.विवेक दिवाकर चौधरी,यावल पंचायत समिती माजी सभापती पल्लवी चौधरी,चंद्रकांत चौधरी,नारायण चौधरी,भंगाळे गोल्डचे संचालक भागवत भंगाळे,प्रगतशील शेतकरी सुरेश चौधरी,भिकारी सोनवणे,माजी महापौर ललित कोल्हे,सिंधु कोल्हे,लेखापरीक्षक पी.बी.विसपुते,माजी नगराध्यक्ष सुनील खडके,डॉ.केतकी पाटील,उज्जैनसिंग राजपूत,डांभुर्णी सरपंच कल्पना कोळी,उपसरपंच पुरुजीत चौधरी इ.सह मान्यवर उपस्थित होते.कार्यक्रमाच्या सुरुवातीला पहलगाम दहशतवादी हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्या नागरिकांना व संस्थेच्या मयत सभासद यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.तदनंतर दीप प्रज्वलनाचा कार्यक्रम होऊन कार्यक्रमास सुरुवात झाली.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पी.पी.लढे व कश्मीरा भंगाळे यांनी केले.प्रास्ताविक रविंद्र निळे तर आभार प्रदर्शन राजेंद्र सोनु भंगाळे यांनी केले.या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी व्यवस्थापक संजय नारखेडे व गणेश साळुंके यांनी परिश्रम घेतले.

Leave A Reply

Your email address will not be published.