Just another WordPress site

यावल शहरातील आयशानगर रस्ता वळणावरील खडुयांमुळे होणाऱ्या वाहन अपघातांकडे नगरपरिषदेने लक्ष द्यावे-नगरवासियाची मागणी !!

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-

दि.१५ मे २५ गुरुवार

येथील शहरातुन जाणाऱ्या भुसावळ मार्गावरील रस्त्यावर फालकनगर बस थांब्या जवळच्या वळणावरील मध्यभागी गेल्या काही दिवसापासून नगर परिषदच्या वतीने काही कारणाने दोन मोठ मोठी खड्डे खोदुन ठेवली असल्याने या अपघाताला आमत्रंण देणाऱ्या खड्डयामुळे पादचाऱ्यांना व वाहनधारकांना जिव धोक्यात घालून याठिकाणी वाहन चालवावे लागत असुन या खड्डयांमुळे मोठा त्रास होत आहे.

दरम्यान यावल शहरातील भुसावळ मार्गावरील फालकनगर बस थांब्याजवळ असलेल्या आयशानगर वस्तीच्या वळणावरील रस्त्याच्या मध्यभागी दोन ठीकाणी नगर परिषदच्या वतीने मागील तिन महिन्यांपासून मोठमोठी खड्डे करून ठेवली आहेत.सदरील रस्त्याच्या मध्यभागी असलेल्या खड्डयांमुळे पादचाऱ्यांपासुन तर वाहनधारकांना वाहन चालवितांना मोठा त्रास सोसावा लागत असुन या ठिकाणी खड्ड्यांचा अंदाज घेता येत नसल्याने खड्डे वाचवितांना दुचाकी वाहनांचे अपघात देखील होत आहेत.परिणामी या ठिकाणी वाहनांचे मोठे अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नसुन नगर परिषद प्रशासनाने तात्काळ लक्ष पुरवून वाहनांसाठी धोकादायक असणारे हे खड्डे बुजण्यात यावे अशी मागणी नागरीक व वाहनधारकांच्या वतीने करण्यात आली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.