Just another WordPress site

किनगाव इंग्लिश मीडियम निवासी पब्लिक स्कूलने परंपरा कायम राखत १००% निकाल ठेवला कायम !!

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-

दि.१५ मे २५ गुरुवार

तालुक्यातील किनगाव येथील इंग्लिश मीडियम निवासी पब्लिक स्कूलच्या इ.१० वीच्या विद्यार्थ्यांनी गेल्या अकरा वर्षांपासूनची १०० टक्के निकालाची परंपरा यावर्षीही कायम राखली असून नुकत्याच जाहीर झालेल्या दहावीच्या शालांत प्रमाणपत्र परीक्षेच्या निकालानुसार प्रविष्ट झालेल्या १३७ विद्यार्थ्यांपैकी १३७ विद्यार्थी पास झाले.

यात देव संजय पाटील याने ९२.४०% गुण मिळवून प्रथम क्रमाक पटकवला व ईशिता विनय महाजन हिने ८९.८०% गुण मिळवून द्वितीय तर तेजस ज्ञानेश्वर सपकाळे ८९% गुण मिळवून तृतीय क्रमांकाने उतीर्ण झाले तसेच स्कुलच्या उर्वरित सर्व विद्यार्थ्यांनी ७५% पेक्षा जास्त गुण मिळवून विशेष प्राविण्य मिळविलेले आहे.गुणवंत सर्व विद्यार्थ्यांचे चेअरमन विजयकुमार देवचंद पाटील,सचिव मनिष विजयकुमार पाटील,मुख्याध्यापक अशोक प्रतापसिंग पाटील,उपमुख्याध्यापक सुहास भालेराव व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांनी कौतुक केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.