यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
दि.१५ मे २५ गुरुवार
रावेर-यावल मतदार संघाचे आमदार अमोल जावळे यांच्या संकल्पनेतून व सुचनेनुसार किनगावसह यावल तालुक्यात आणि परीसरातील संजय गांधी श्रावणबाळ योजनेच्या लाभार्थ्यांना आधार कार्ड सह विविध तांत्रिक अडचणींमुळे निधी मिळण्यास येत असलेल्या अडचणींची समस्या सोडवण्यासाठी किनगाव येथे यावल तहसील कार्यालयामार्फत शिबिराचे आयोजन करण्यात आले.
या शिबिरात परिसरातील जे लाभार्थी लाभांपासून वंचित आहेत ते आपल्या समस्या सोडवण्यास येथे आले होते व महसूल विभागाचे कर्मचारी यांनी सर्व लाभार्थ्यांच्या समस्यांचे निवारण केले.जिल्हा परिषद मराठी शाळा किनगाव येथे घेण्यात आलेल्या या शिबीरासाठी मंडळ अधिकारी ए.एल.पाटील,ग्राममंडळ अधिकारी एम.पी.खुर्दा,किनगाव बु ए.ए.राऊत,किनगाव खु बि.जी.सुर्यवंशी,चिंचोली सी.सी.झटके नायगाव,के.के.तडवी,आडगाव महसूल सेवक गणेश वराडे,किनगाव,ज्ञानेश्वर सोळंके,चिंचोली युवा प्रशिक्षणार्थी डिगंबर सुरवाडे,किनगाव,मनिषा बाविस्कर,किनगाव संजय गांधी योजनेच्या अव्वल कारकून वैशाली मधूकर पाटील व संगणक संचालक भुषण सोनार यांनी परिश्रम घेतले.तसेच संजय गांधी योजना विभागाचे नायब तहसीलदार मनोज खारे यांनी ही या शिबीरात पाहणी केली.तर या शिबीराच्या यशस्वीतेसाठी अपंग सेलचे अध्यक्ष अरुण पाटील व माजी पंचायत समितीचे उपसभापती रविंद्र ठाकूर किनगाव यांचे सहकार्य लाभले.