Just another WordPress site

सातपुडा पर्वतात भुजल सर्वेक्षण व विकास यंत्रणाव्दारे झऱ्यांची माहीती संकलित करण्याच्या उपवनसंरक्षक जमीर शेख यांच्या सूचना !!

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-

दि.१५ मे २५ गुरुवार

यावल प्रादेशिक वनविभाग जळगाव हे भुजल सर्वेक्षण आणी विकास योजना जळगाव यांच्या सोबत हंगामी आणी बारमाही झऱ्यांची माहीती संकलन करण्यासाठी जवळपास १४ वनरक्षकांना एन्युमरेटर्स म्हणुन प्रक्षीक्षण देण्यात आले.१४ वनरक्षक हे एन्ड्रॉईड फोनच्या माध्यमातुन व वरिष्ठ भुवैज्ञानिक यांनी दिलेल्या सॉफ्टवेअरच्या प्रशिक्षणाव्दारे झऱ्यांचे जिओ टॅगिंग केले जावुन व पहिल्यांदा पुर्ण विभागातील हंगामी व बारमाही झऱ्यांची नोंद होईल.त्याचा उपयोग करून भविष्यात पाणी वाढविण्यासाठी करण्यात येइल तसेच वनविभाग देखील पाणलोट क्षेत्र व्यवस्थापन मध्ये व जलमृद कामांमध्ये भविष्यात त्याचा भरपुर वापर होणार आहे.

सातपुडा पर्वताच्या क्षेत्रात अशा प्रकारचे जिओ टॅगिंग पहिल्यांदा होत असल्याने वनविभागाकडून संबंधित वनरक्षक यांना आवश्यक वाहने व ईतर पुरवठा वनविभागाकडून केला जाणार असल्याची माहिती उपवनसंरक्षक जमीर शेख यांनी प्रात्यक्षिक मार्गदर्शन बैठकीत दिली.याप्रसंगी सहाय्यक भुवैज्ञानिक सुधीर जैन व जि आय एस सहाय्यक महेन्द्र बाविस्कर यांनी अॅन्ड्रोइड फोनच्या माध्यमातुन प्रत्यक्ष अॅप्लीकेशन मध्ये माहिती संकली करून प्रात्यक्षीक दाखविले.सदरच्या मार्गदर्शन कार्यक्रमास यावल विभागाचे उपवनसंरक्षक जमीर शेख,सहाय्यक वनसंरक्षक वनीकरण व वनजीव प्रथमेश हाडपे,प्रादेक्षीक व कॅम्पाचे सहाय्यक वनसंरक्षक चोपडा समाधान पाटील,वनपरिक्षेत्र अधिकारी चोपडा बि.के.थोरात यांच्या प्रमुख उपस्थितीत ही प्रात्यक्षिक मार्गदर्शन बैठक घेण्यात आली.या बैठकीत यावल (प्रादेक्षिक) वन विभाग जळगाव मधील जवळपास १४वनरक्षकांना एन्युमरेटर्स म्हणुन प्राशिक्षण देण्यात आले.भुजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा जळगाव यांच्यासोबत हंगामी तसेच बारमाही झऱ्यांची माहीती संकलीत करण्यात येणार असुन सातपुडयामध्ये अशा प्रकारचे जिओ टॅगिंग पहिल्यांदाच होत असुन यापुढे यावल वन विभाग जळगाव तसेच भुजल सर्वेक्षण विकास यंत्रणा जळगाव यांच्याकडून संयुक्तरित्या माहीती संकलीत करण्यात येणार आहे अशी माहिती वन विभागाच्या वतीने सहाय्यक वनसंरक्षक वनीकरण व वनजीव प्रथमेश हाडपे प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकाव्दारे दिली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.