यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
दि.१६ मे २५ शुक्रवार
येथील बस स्थानकामध्ये सतत होणाऱ्या चोऱ्या आणि माता भगिनींचे दागिने लंपास केल्याच्या घटना घडल्याच्या पार्श्वभूमीवर समाजाशी आपले काही देणे आहे ही सामाजीक बांधिलकी जोपासून परिवर्तन फाउंडेशनचे संस्थापक युवराज सोनवणे यांनी यावल बसस्थानकमध्ये पोलीस चौकी उभारून चोरट्यांचा बंदोबस्त व्हावा यासाठी आमदार अमोल हरिभाऊ जावळे यांच्या उपस्थित जेष्ठ पत्रकार अरुण पाटील यांच्या हस्ते चौकीचे लोकार्पण करण्यात आले.
दरम्यान बसस्थानक आवारात गेल्या काही दिवसांपासुन प्रवाशांच्या अमुल्य वस्तुंच्या चोरीच्या प्रमाणात वाढ झाली असुन याबाबत पोलीसात गुन्हे दाखल आहेत मात्र या ठिकाणी पोलीस बंदोबस्त नसल्याकारणाने चोऱ्यांच्या प्रमाणात वाढ झाली आहे.या गोष्टींचा सारासार विचार परिवर्तन फाउंडेशन या समाजसेवी संघटनेच्या माध्यमातुन बसस्थानक परिसरात पोलीस चौकी उभारण्यात आली असुन त्याचे नुकतेच यावल रावेर विधान सभा क्षेत्राचे आमदार अमोल हरिभाऊ जावळे यांच्या उपस्थितीत व त्यांच्या सूचनेनुसार लोकार्पण पत्रकार अरुण पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.याप्रसंगी एसटी आगाराचे व्यवस्थापक दिलीप महाजन यांनी आमदार अमोल हरिभाऊ जावळे,भाजपा तालुका अध्यक्ष सागर कोळी व परिवर्तन फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष युवराज सोनवणे यांचे स्वागत व सत्कार केला.यावल एसटी आगारात प्रवाशांच्या सुरक्षेसाठी पोलीस चौकी उभारण्यात आली असुन या चौकीमध्ये कायम एक महिला व एक पुरुष पोलीस कर्मचारी ठेवण्यासंदर्भात आपण जिल्हा पोलीस अधीक्षक व पोलीस निरिक्षक यांना पत्र लिहून या ठिकाणी कायमस्वरूपी बंदोबस्त कसा राहील व प्रवाशांना सुरक्षा प्रदान करीत चोऱ्यांना कसा आळा बसेल यासाठी त्वरित उपाय योजना करण्यातबाबत सुचना करणार असल्याची माहीती यावेळी आमदार अमोल जावळे यांनी सांगितले.यासाठी आपण निश्चित प्रामाणिकपणा आणि कार्यतत्पर कामगिरी करूया असेही सर्वांच्या समोर आमदार जावळे यांनी आश्वासित केले.एस टी बस आगार व्यवस्थापक दिलीप महाजन यांनी या प्रसंगी परिवर्तन फाऊंडेशन या समाजसेवी संघटनेचे अध्यक्ष व उपास्थित मान्यवरांचे आभार मानले.