Just another WordPress site

मार्सिलिस बंदरावर स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे स्मारक उभारण्यात यावे-विधानसभा अध्यक्ष अ‍ॅड.राहुल नार्वेकर

मुंबई-पोलीस नायक(वृत्तसेवा):-

दक्षिण फ्रान्स येथील मार्सिलिस बंदरावर स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचे स्मारक उभारण्यात यावे असे निवेदन विधानसभा अध्यक्ष अ‍ॅड.राहुल नार्वेकर यांनी केंद्रीय गृह मंत्री अमित शहा यांना दिले आहे.नॉर्थ ब्लॉकमध्ये गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेऊन यासंदर्भात चर्चा करून त्यांनी हे निवेदन दिले आहे.

स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी इंग्रजांच्या ताब्यातून सुटका करून देशाचा स्वातंत्र्य लढा सुरू ठेवण्यासाठी दक्षिण फ्रान्सच्या मार्सेलिस बंदरामध्ये बोटीतून उडी घेतली होती.या ऐतिहासिक घटनेला ह्यावर्षी ११२ वर्ष पूर्ण होत आहेत.इतिहासामध्ये या घटनेला अनन्यसाधारण महत्व आहे. त्यामुळे या ठिकाणी स्वातंत्र्यवीर सावरकरांचे स्मारक असावे अशी भारतीयांची अपेक्षा असल्याचे त्यांनी सांगितले.या स्मारकाच्या संकल्पनेबाबत महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचादेखील पाठिंबा असल्याची माहिती राहुल नार्वेकर यांनी यावेळी अमित शहांना दिली.यानंतर राहुल नार्वेकर यांनी याबाबत परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांची देखील भेट घेतल्याचे सांगितले.केंद्र आणि राज्य सरकार परस्पर समन्वय राखून पुढील निर्णय घेतील असे देखील राहुल नार्वेकर यांनी यावेळी सांगितले.
Leave A Reply

Your email address will not be published.