सीबीएसई बोर्ड १० विच्या परीक्षेत देवयानी शिंदेने ९९ टक्के गुण मिळविल्याबद्दल पालकमंत्रांच्या हस्ते सत्कार !!
महेश बोरसे,पोलीस नायक
चोपडा तालुका (प्रतिनिधी) :-
दि.१७ मे २५ शनिवार
येथील पोलीस नायकचे तालुका प्रतिनिधी व भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे चिटणीस महेश बोरसे तसेच अनिकेत अनिलराव बोरसे व प्रशांत बोरसे यांची भाची देवयानी महेश शिंदे राहणार चोपडा हल्ली मुक्काम जळगाव हिने नुकत्याच जाहीर झालेल्या सीबीएसई बोर्ड दहावीच्या शालांत प्रमाणपत्र परीक्षेत ९९ टक्के गुण मिळवून घवघवीत यश संपादन केले आहे.
दरम्यान माध्यमिक शालांत परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला असून सीबीएसई बोर्ड दहावीच्या शालांत प्रमाणपत्र परीक्षेत कु.देवयानी महेश शिंदे हिने सीबीएसई ओरियन इंग्लिश मीडियम स्कूल जळगाव या शाळेतून ९९ टक्के गुण मिळवून घवघवीत यश संपादन केल्याबद्दल कु.देवयानी शिंदे हिचे जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील व जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या हस्ते नुकताच सत्कार करण्यात आला.कु.देवयानी महेश शिंदे हिच्या यशाबद्दल पोलीस नायकचे तालुका प्रतिनिधी व भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे चिटणीस महेश बोरसे तसेच अनिकेत अनिलराव बोरसे व प्रशांत बोरसे तसेच तिचे आईवडील,नातेवाईक मंडळी यांच्याकडून अभिनंदन करण्यात येत असून भावी वाटचालीस शूभेच्छा देण्यात आल्या आहेत.