ईडीच्या कारवाईआधी अमित शाहांना फोन !! संजय राऊतांचा पुस्तकातून दावा !! संजय राऊत यांनी तुरुंगातील अनुभवांवर लिहिलेल्या पुस्तकाचे आज प्रकाशन !!
संजय राऊत : मी संजय राऊत बोलतोय,मला गृहमंत्र्यांशी बोलायचे आहे.
गृह मंत्रालय कर्मचारी : गृहमंत्री सध्या महत्त्वाच्या बैठकीत आहेत,मोकळे झाले की कॉल करतील.
संजय राऊत : अर्जंट है !
हे संभाषण ऐकून संजय राऊत यांच्या दिल्लीतील घरी असतांना सोबत असलेले त्यांचे मित्र चक्रावले आणि राऊतांना तुम्ही हे काय करताय असे विचारु लागले.
संजय राऊत : मी राज्यसभा सदस्य आहे.मी गृहमंत्र्यांशी बोलू आणि भेटू शकतो.
दहा मिनिटांनी गृह मंत्रालयातून फोन आला, त्यावेळी शाह-राऊत यांच्या झालेल्या संभाषणाबद्दल काय दावा?
अमित शाह : संजयजी बोलिये,आपने कॉल किया था !
संजय राऊत : अमित भाई,आपले राजकीय वाद आहेत आणि तुम्ही मला टार्गेट करु शकता.
अमित शाह : मै समझा नही !
संजय राऊत : मला टार्गेट करायचे असेल तर मी या क्षणी दिल्लीत आहे.ईडीला सांगा,मला अटक करा,पण माझ्यासाठी इतर निरपराध लोकांना का त्रास देताय ? त्याने काय साध्य होणार आहे ?
विनाकारण माझ्या मुंबईतील मित्रांच्या घरांवर छापे मारले,त्यांना ईडीवाले घेऊन गेले.
अमित शाह : मुझे कुछ जानकारी नही,मै देखता हू !
संजय राऊत : सर,आपण गृहमंत्री आहात,राज्यसभा सदस्यांसंदर्भात कारवाई सुरु आहे.
एवढे ऐकून अमित शाह यांनी फोन ठेवला आणि मला आशिष शेलार यांचा फोन आला असा दावा संजय राऊत यांनी पुढे केला आहे.
आशिष शेलार : संजयजी काय प्रकरण आहे ? मला अमितभाईंचा फोन आलेला,जरा ऐकून घ्या म्हणालेत.
संजय राऊत : आशिषजी,गृहमंत्र्यांना सगळा विषय माहिती आहे,त्यांच्या संमतीविना हे शक्य नाही.प्रवीण आणि सुजित यांना तुम्हीही ओळखता,मी म्हणतोय,सरळ मला अटक करा आणि सुडाचा कंडू शमवा इतरांना कशाला छळताय ?
अशा प्रकारची माहिती संजय राऊत यांनी या पुस्तकात नमूद केली असून आज या पुस्तकाचे प्रकरण होणार आहे.परिणामी या पुस्तकातून आणखी कोणकोणता उलगडा होणार आहे याकडे अनेकांच्या नजरा लागल्या आहेत.