Just another WordPress site

वाढदिवसावर होणारा खर्च टाळून देशहितासाठी सैनिक दलास आर्थिक मदत : डॉ.कुंदन फेगडे यांच्या स्तुत्य प्रयत्नाला यश !!

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-

दि.१७ मे २५ शनिवार

राज्याचे जलसंपदा मंत्री ना.गिरीष महाजन यांच्या वाढदिवसानिमित्त बॅनरबाजी व इतरत्र कुठलाही खर्च न करता भारतीय सैनिक दलाला भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी व यावल नगरपरिषदचे माजी नगरसेवक डॉ कुंदन फेगडे यांनी मदतीचा हात दिला आहे.

मदाराष्ट्र राज्याचे जलसंपदा मंत्री ना.गिरीष महाजन यांच्या वाढदिवसानिमित्ताने त्यांनी जळगाव जिल्ह्यातील आपल्या तमाम पक्षाच्या कार्यक्रत्यांना यंदा जम्मु कश्मीरच्या पहलगाम येथे झालेल्या अतिरेकी हल्ला व भारताच्यावतीने ऑपरेशन सिन्दुर सुरू असल्याकारणाने जाहीराती व बॅनरबाजीवर खर्च न करता सेवा उपक्रम राबवावे असे आवाहन केले होते.या आवाहनास प्रतिसाद देत यावल येथील भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी व यावल नगरपरिषदचे माजी नगरसेवक डॉ.कुंदन फेगडे यांनी सेवा उपक्रम म्हणुन राष्ट्रीय संरक्षण निधीसाठी २१ हजार रूपयांची आर्थिक मदत पाठवली आहे.दरम्यान डॉ.कुंदन फेगडे यांनी सर्व देशवासीयांना यथाशक्ती प्रमाणे देशाला मदत करण्याचे आवाहन केले आहे व प्रत्येक नागरीकांनी आपल्या आनंदाच्या क्षणी खर्चात कपात करून देशसेवेत मदत करावी व आपल्या देशाचे सैनिक दलाच्या जवानांच्या आरोग्याला आणि शहीद झालेल्या कुटुंबीयांना मदत होइल असेही डॉ.कुंदन फेगडे यांनी म्हटले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.