ना.गिरीशभाऊ महाजन यांच्या वाढदिवसानिमित्त रावेर-पुनखेडा-पातोंडी रस्त्याच्या डांबरीकरणाचे भूमिपूजन !!
यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
दि.१८ मे २५ रविवार
राज्याचे जलसंपदामंत्री ना.गिरीशभाऊ महाजन यांच्या वाढदिवसानिमित्त सुमारे ५ कोटी रूपयांच्या खर्चाचे रावेर-पुनखेडा-पातोंडी रस्त्याच्या डांबरीकरणाच्या कामाचे भूमिपूजन काल दि.१७ मे शनिवार रोजी महंत राजगिरी महाराज यांच्या शुभहस्ते करण्यात आले.या कार्यक्रमास विविध क्षेत्रातील मान्यवर व भारतीय जनतापक्षाचे पदाधिकारी,ग्रामस्थ आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दरम्यान सुमारे पाच कोटी रुपयांच्या निधीतून हा रस्ता तयार केला जाणार असून आमदार अमोल जावळे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे हा प्रस्ताव मंजूर करण्यात आला आहे.गेल्या काही वर्षांपासून या रस्त्याची अवस्था अत्यंत खराब झाली होती व त्यामुळे वाहनधारक व प्रवाशांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत होते.या रस्त्याच्या डांबरीकरणामुळे रावेर ते पातोंडी व पुनखेडा या भागांचा संपर्क अधिक चांगल्याप्रकारे प्रस्थापित होणार असून मुक्ताईनगर रावेर दरम्यानचा प्रवास अधिक सुरक्षित,जलद आणि सुखकर होणार आहे.कालपासून प्रत्यक्ष या रस्त्याच्या कामास सुरुवात झाल्याने ग्रामस्थांमध्ये समाधानाचे व आनंदाचे वातावरण दिसुन येत आहे.गेल्या अनेक वर्षांची मागणी पूर्ण होत असल्याने नागरिकांकडून रावेर यावल विधानसभा मतदारसंघाचे आमदार अमोल जावळे यांचे आभार मानले जात आहे.सदर कार्यक्रमास भारतीय जनता पक्षाचे प्रदेश कार्यकारणी सदस्य सुरेश धनके,जिल्हा उपाध्यक्ष पद्माकर महाजन,प्रल्हाद पाटील,माऊली फाउंडेशन अध्यक्ष डॉ.संदीप पाटील,रावेर पंचायत समिति माजी सदस्य पि.के.महाजन,उत्तर महाराष्ट्र संपर्क प्रमुख उमाकांत महाजन,भाजयुमो जिल्हा सरचिटणीस संदीप सावळे,भाजप तालुकाध्यक्ष दुर्गेश पाटील, माजी तालुकाध्यक्ष महेश चौधरी,पुनखेडा सरपंच कीर्ती पाटील,पातोंडी सरपंच नम्रता कोळी राजन लासूरकर,विजय महाजन,संजय महाजन,तालुका अध्यक्ष रविंद्र पाटील,सूर्यकांत देशमुख,तालुका उपाध्यक्ष साजन चौधरी,बाळा आमोदकर,उद्देश कचरे,वासुदेव नरवाडे,पवन चौधरी,निलेश सावळे,अरुण शिंदे,नितीन पाटील,समाधान पाटील,यशवंत आप्पा,रमेश सावळे,लक्ष्मण सावळे,राजेंद्र पाचपोहे,डिगंबर बोरसे,आशा सपकाळे,नंदनी पंत,आशा मोरे,अजाबराव पाटील,उमेश वरणकर,उमेश कोळी,मनोहर सावळे,चेतन जैन,सुरेश चौधरी,पंडित सर,श्रीराम कोळी,मनोज पाटील,गणेश बोरसे,लखन महाजन,मोहन बोरसे,योगेश महाजन,पवन पाटील,पंडित पाचपोळ यांच्यासह भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच परिसरातील ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते.