Just another WordPress site

आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर फैजपुर येथे काँग्रेस पक्षाची बैठक संपन्न !!

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-

दि.१८ मे २५ रविवार

आगामी काळात होवू घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर यावल तालुक्यातील फैजपुर येथे काल दि.१७ मे शनिवार रोजी राष्ट्रीय काँग्रेस पक्षाची संगठनात्मक बैठक जिल्हाध्यक्ष प्रदीप पवार यांच्या अध्यक्षतेखाली मोठ्या उत्साहात पार पडली.

दरम्यान माजी आ.शिरीष चौधरी यांनी पक्षातील निष्ठावान कार्यकर्त्यांना तसेच तरुण पदाधिकाऱ्यांना आगामी काळात होऊ घातलेल्या निवडणुकांमध्ये संधी देण्याचा काँग्रेस पक्षाचा प्रयत्न असणार असल्याचे नमूद केले.तर आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या नगरपालिका,जिल्हा परिषद,पंचायत समिती निवडणूकांसाठी पक्ष संघटन,कार्यकर्त्यांची मोर्चे बांधणी व उमेदवार चाचपणीवर विशेष लक्ष देण्यात येणार आहे असे जिल्हाध्यक्ष प्रदिप पवार यांनी सांगितले.तसेच येत्या २१ मे बुधवार रोजी भारताचे माजी पंतप्रधान स्व.राजीव गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त तसेच २२ एप्रिल रोजी पहलगाम येथे झालेल्या आतंकवादी हल्याच्या निषेधार्त भारतीय सैन्य दल,नेव्ही,एअर फोर्स यांनी केलेल्या कर्तबगारीचे अभिनंदन करत सैन्यदलाचे मनोबल वाढवण्याकरता व सैन्याबद्दल अभिमान व्यक्त करण्यासाठी धनाजी नाना महाविद्यालय फैजपुर येथील ‘प्रेरणास्तंभ’ पासून ते छत्री चौकातील ‘स्वतंत्रता स्मारक’ पर्यंत “तिरंगा शोभा यात्रा” काँग्रेस पक्षातर्फे २१ मे रोजी सकाळी १० वाजता आयोजित करण्यात येणार असल्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला.तरी सर्व देशप्रेमींनी भारतीय सैन्याचे मनोबल वाढवण्यासाठी जास्तीत जास्त संस्थेने या तिरंगा शोभायात्रेत उपस्थित रहावे असे आवाहन काँग्रेस पक्षातर्फे करण्यात आले आहे.यावेळी माजी आ.शिरीष चौधरी,प्रदेश उपाध्यक्ष योगेंद्रसिंग पाटील,माजी आमदार रमेश चौधरी,जमील शेख,ज्ञानेश्वर कोळी,काँग्रेस आदिवासी सेल जिल्हाध्यक्ष संजू जमादार,यावल तालुकाध्यक्ष प्रभाकर सोनवणे,रावेर तालुकाध्यक्ष डॉ.राजेंद्र पाटील,यावल पंचायत समितीचे माजी सभपती लिलाधरशेठ चौधरी,पंचायत समिती यावल माजी गटनेते शेखर पाटील,धनंजय शिरीष चौधरी,रावेर शहराचे माजी नगराध्यक्ष हरिशशेठ गनवाणी,सैय्यद जावेद अली जनाब,हमीद तडवी,राजू सवरणे,हयात शेठ,रियाज शेख,कलिम मेंबर,अय्युब मेंबर यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रमुख उपस्थितीत बैठक पार पडली.

तसेच

Leave A Reply

Your email address will not be published.