प्रहार जनशक्ती पक्षाच्या दोन प्रमुख पदाधिकाऱ्यांचा राजीनामा !! आगामी नगर परिषद निवडणुकीसाठी राजकीय खेळी !!
यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
दि.१९ मे २५ सोमवार
येथील प्रहार जनशक्ती पक्षाच्या अल्पसंख्यांक विभागाच्या दोन महत्वाच्या पदाधिकाऱ्यांनी आपल्या पदाचा नुकताच राजीनामा दिला असून आपण आपल्या कौटूंबीक अडचणीमुळे पक्षाच्या पदाचा राजीनामा देत असल्याचे राजीनामा पत्रात म्हटले असले असून राज्यात आगामी काळात होवु घातलेल्या नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर पक्षाला हा मोठा धक्का मानला जात आहे.
दरम्यान येथील प्रहार जनशक्ति पक्षाचे अल्पसंख्यांक विभागाचे यावल तालुका अध्यक्ष मोहम्मद हकीम मोहम्मद याकुब व पक्षाच्या शहर कार्यकारणीचे शहर अध्यक्ष उमर अली मोहम्मद कच्छी यांनी प्रहार जनशक्ति पक्षाच्या अल्पसंख्यांक विभागाचे जिल्हा उपाध्यक्ष हाजी शेख हकिम शेख अल्लाउद्दीन खाटीक यांच्याकडे नुकताच आपण आपल्या कौटूंबीक व खाजगी कामांच्या अडचणीमुळे पक्षाच्या पदाचा राजीनामा देत असल्याचे म्हटले आहे.दरम्यान आगामी काळात होवु घातलेल्या नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर ही राजकीय खेळी मानली जात असल्याची चर्चा असुन यावल शहरात होणाऱ्या एका पक्षप्रवेश सोहळ्यात हे दोघही महत्वाचे पदाधिकारी शहरातील शेकडो कार्यकर्त्यांसह पक्ष प्रवेश करणार असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे.