शासनाने ई-बाईक टॅक्सी व पीएम ई-बस चालवण्याचा निर्णय मागे घ्यावा !! ऑटो रिक्शा चालकमालक संघटनेच्या वतीने २१ मे रोजी धरणे आंदोलन करण्याचा इशारा !!
यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
दि.१९ मे २५ सोमवार
शासनाच्या वतीने घेण्यात आलेला ई-बाईक टॅक्सी व पीएम ई-बस चालवण्याचा निर्णय मागे घेण्यात यावा अन्यथा दि.२१ मे बुधवार रोजी कामगार नेते शंशाकराव व विलास भालेकर यांच्या नेतृत्वात राज्यभर धरणे आंदोलन करण्यात येईल असा इशारा ऑटो रिक्शा चालकमालक संघटनेच्या वतीने देण्यात आला आहे.
दरम्यान महाराष्ट्र सरकारने राज्यभरात बेरोजगार युवकांना स्वयरोजगाराची संधी देण्याच्या नावाखाली ई-बाईक टॅक्सीला परवानगी देण्याचा निर्णय घेतला आहे.यात महाराष्ट्र सरकारने रोजगार निर्मितीच्या नावाने ई-बस आणि बाईक पुलींग टॅक्सीला दिलेली मंजुरी राज्यातील ऑटोरिक्षा चालकांच्या जिवावर उठणार असुन त्यामुळे ऑटोरिक्षा चालक देशोधडीला लागेल.यामुळे महाराष्ट्रातील १५ लाख ऑटोरिक्षा चालकांचा रोजगार धोक्यात येणार आहेत तसेच केंद्र सरकारने जळगाव शहर व शहरालगत असलेल्या गावांसाठी पीएम ई-बस सेवा सुरू करित आहे यामुळे ऑटोरिक्षा चालकांच्या रोजगारीवर मोठा आर्थिक परिणाम होणार आहे.या ई-बस सेवा देतांना ऑटो रिक्षा चालकांच्या व्यवसायाचाही विचार केला पाहीजे व पीएम ई-बस सेवा चालवण्याचा निर्णय मागे घेण्यात यावा. ऑटोरिक्षा चालकांकरीता स्थापन झालेल्या महामंडळात अनेक त्रुटया आहेत ज्यासाठी ऑटोरिक्षा कृती समितीने सुधारणा सुचवल्या आहेत व त्या त्रुटया दूर कराव्या.ऑटो रिक्षा चालकांवरील सुरू असलेला अन्याय त्वरीत बंद करण्यात यावा यासह विविध मागण्यांसाठी ऑटोरिक्षा चालक मालक संघटना संयुक्त कॄति समितीचे प्रदेश अध्यक्ष शंशाक राव व महासचिव विलास भालेकर यांच्या नेतृत्वात बुधवार दि.२१ मे २५ बुधवार रोजी महाराष्ट्रभर धरणे आंदोलन करण्यात येणार आहे.त्याअंतर्गत ऑटोरिक्षा चालक मालक संघटना संयुक्त कॄति समिती महाराष्ट्र कार्याध्यक्ष प्रल्हाद सोनवणे जिल्हाध्यक्ष प्रमोद वाणी यांच्या नेतृत्वात उत्तर महाराष्ट्रासह जळगाव RTO कार्यालयसमोर ११ ते ५ यावेळेत धरणे आंदोलन करण्यात येणार आहे.यावेळी राज्याचे परिवहन मंत्री व परिवहन आयुक्त यांना प्रादेशिक परिवहन अधिकारी यांच्यामार्फत मागण्यांचे निवेदन देण्यात येणार आहे.तरी या धरणे आंदोलनात जळगाव जिल्ह्यातील ऑटो रिक्षा युनियन संघटना तसेच सर्व ऑटोरिक्षा चालक मालकांनी मोठया संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन ऑटो रिक्शा चालक मालक कृती समितीचे कार्यध्यक्ष प्रल्हाद सोनवणे व जळगाव जिल्हा अध्यक्ष प्रमोद वाणी यांनी केले आहे.