Just another WordPress site

जलवाहीनी फुटून लाखो लिटर पाण्याचा अपव्यय होत असल्याने नगरपरिषदने तात्काळ लक्ष द्यावे -शिवसेना शिंदे गटाचे जिल्हा उपसंघटक नितिन सोनार यांची मागणी !!

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-

दि.१९ मे २५ सोमवार

येथील नगरपरिषद व्यापारी संकुलनाच्या मागील बाजुस असलेली व शहराला पाणीपुरवठा करणारी जलवाहिनी फुटल्याने रोज लाखो लिटर पिण्याचे स्वच्छ पाणी वाहून जात असुन नगर परिषद प्रशासनाने या प्रश्नाकडे तात्काळ लक्ष देवून सदरची फुटलेल्या जलवाहिनीची गळती तात्काळ दुरूस्त करण्यात यावी अशी मागणी शिवसेना शिंदे गटाचे रावेर लोकसभा क्षेत्राचे जिल्हा उपसंघटक नितिन सोनार यांनी केली आहे.

याबाबत शिवसेना शिंदे गटाचे जळगाव जिल्हा उपसंघटक नितिन सोनार यांनी म्हटले आहे की,मागील दोन दिवसापासुन यावल शहरातील प्रमुख मुख्य रस्त्यावरील बाजारपेठेत असलेल्या नगर परिषदच्या व्यापारी संकुलनाच्या मागील बाजुस असलेली पाणी पुरवठा करणारी जलवाहिनी फुटल्याने लाखो लिटर पाणी वाहून जात असल्याने संपूर्ण परिसर हा चिखलमय झाला आहे.सदरहू या ठिकाणी असलेले व्यापारी व व्यवसायीक यांना या चिखलामुळे त्रास सहन करावा लागत असुन नगरपरिषद प्रशासनाने तात्काळ लक्ष देऊन या ठीकाणी फुटलेली जलवाहिनीची गळती दुरुस्त करावी त्याचबरोबर शहरात विविध ठिकाणी वारंवार होत असलेल्या जलवाहीनी गळतीकडे मुख्यधिकारी यांनी विशेष लक्ष देणे गरजेचे आहे अशी मागणी शिवसेना शिंदे गटाचे जिल्हा उपसंघटक नितिन सोनार यांनी केली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.