यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
दि.१९ मे २५ सोमवार
बदलत्या युगात भावी पिढीवर सनातन धर्माचे संस्कार व्हावे आणि नवीन पिढी हि संस्करण,नीतिवान,शूरवीर,साहसी,आदर्श व्यक्तिमत्व जीवनात आत्मसात करून एक नवीन भारताचा उदय व्हावा यासाठी तालुक्यातील डोंगर कठोरा येथे जिल्हा परिषद मराठी शाळेत दि.१ मे ते २१ मे २५ या कालावधीत बाल संस्कार शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.सदरहू या बाल संस्कार शिबिराला आज दि.१९ मे सोमवार रोजी आमदार अमोल हरिभाऊ जावळे यांनी सदिच्छा भेट देऊन सदरील स्तुत्य उपक्रमाबाबत समाधान व्यक्त करून शुभेच्छा दिल्या.
दरम्यान सदर शिबिरामध्ये लहान बालकांना गायन,कीर्तन,टाळ व मृदूंग वाजविणे असे कीर्तनादी कार्यक्रम शिकविले जाणार आहे.सदरील बाल संस्कार शिबिराला आज दि.१९ मे सोमवार रोजी आमदार अमोल जावळे यांनी भेट सदिच्छा दिली व सदरील उपक्रम राबविणाऱ्या आयोजकांचे आभार मानून समाधान व्यक्त केले.यावेळी वेदुनाथ पाटील,चंदू भिरूड,गणेश जावळे,ह.भ.प.रवी पाटील महाराज,ह.भ.प.दत्तात्रय गुरव महाराज,ह.भ.प.खुशाल महाराज,ह.भ.प.दिनेश महाराज,ह.भ.प.गणेश महाराज,जगन्नाथ राणे, पद्माकर कोळी,रुपेश पाटील,दिनेश पाटील,डिगंबर खडसे,अरविंद पाटील,डिगंबर सुपे,रवींद्र बऱ्हाटे यांच्यासह भाजपा कार्यकर्ते व ग्रामस्थ उपस्थित होते.